पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या...

No photo description available.
शिक्रापूर, ता. ६ मार्च २०२० (प्रतिनिधी): सणसवाडी (ता. शिरूर) येथील राहत असलेल्या एका प्रेमविवाहित जोडप्यातील पतीने पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली.महादेव कंकाळ असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.शिक्रापूर पोलीस स्थानकात आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सणसवाडी येथे राहणाऱ्या महादेव कंकाळ व मनीषा कंकाळ यांचा २०१३ मध्ये विवाह झाला होता.त्यांनतर त्यांच्यामध्ये वारंवार कौटुंबिक वाद होत होते.


याबाबत महादेव हा त्यांच्या आई-वडिलांना फोन करून पत्नी वाद घालून भांडण करत असल्याचे सांगत होता.त्यांनतर २६ जानेवारी २०२० रोजी महादेवने आईला फोन करून पत्नी खूप त्रास देत असून मी या त्रासाला कंटाळून गेलो आहे,असे बोलून फोन कट केला.त्यांनतर शिक्रापूर पोलिसांनी फोन करून महादेवने आत्महत्या केल्याबाबतची माहिती महादेवच्या आई-वडिलांना दिली.त्यांनी शिक्रापूर येथे येऊन ग्रामीण रुग्णालय येथे असलेला महादेवचा मृतदेह शवविच्छेदन करून ताब्यात घेतला आणि गावी नेऊन त्यावर अंत्यसंस्कार केले.परंतु महादेवची पत्नी अथवा तिच्या माहेरचे कोणीही अंत्यविधीसाठी आलेले नव्हते.


त्यांनतर महादेवच्या घरच्यांनी सर्व धार्मिक क्रियाक्रम उरकले आणि त्यांनतर ४ मार्च रोजी शिक्रापूर पोलीस स्टेशन गाठले.याबाबत विमल भगवान कंकाळ (रा. सादोळा ता. माजलगाव जि. बीड) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली.पोलिसांनी मनीषा महादेव कंकाळ (रा. सणसवाडी ता. शिरूर) हिच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण भालेराव करीत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या