बँक कर्मचाऱ्याने केली महिलेकडे ही विचित्र मागणी...

Image may contain: text
यवतमाळ, ता. ६ मार्च २०२० : शेतकरी महिलेकडे ट्रॅक्टरच्या कर्जाचे हफ्ते थकले असल्याने त्यांच्या वसुलीसाठी गेलेल्या एका बँकेच्या प्रतिनिधीने शेतकरी महिलेला शरीरसुखाची मागणी केली.महिलेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळच्या घाटंजी येथे उघडकीस आला आहे.पीडित महिलेची पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला.त्यानंतर ती पीडित महिलेने थेट पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केली.



घाटंजीच्या मोवाडा येथे हा प्रकार घडल्यानंतर पीडित महिलेने घाटंजी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली असता पोलिसांनी तक्रार घेतली नाही.त्यानंतर महिलेने थेट पोलीस अधिक्षकांकडे तक्रार दिल्यानंतर घाटंजी पोलिसांनी इंडसइंड बँकेचा प्रतिनिधी सुरज गजभिये विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.मोवाडा येथील या पीडित शेतकरी महिलेने इंडसइंड बँकेकडून अर्थसहाय्य घेऊन शेतीकरिता ट्रॅक्टर खरेदी केला होता.त्याचे २ हप्ते भरण्यात आले.तिसरा हप्ता थकला होता.


बँकेचा थकित हप्ता न भरल्याने याच्या वसुलीसाठी बँक प्रतिनिधी सुरज गजभिये यांच्यासह चौघेजण महिलेच्या घरी धडकले.यांच्यापैकी तिघांनी ट्रॅक्टर जप्त करून नेला.तर सुरज गजभियेने टॅक्टर सदंर्भात माहिती देण्याच्या बहाण्याने महिलेला पाणी आणायला सांगितले.यावेळी महिलेशी लगट करण्याचा प्रयत्न केला.त्यानंतर तिला शरीर सुखाची मागणी केली.पीडित महिलेने आरडा ओरड केल्याने शिवीगाळ करून आरोपी पसार झाला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या