सलमान खानने घेतला कोरोना व्हायरसचा धसका...

Image may contain: 1 person
मुंबई, ता. ६ मार्च २०२० (प्रतिनिधी): अख्ख्या जगाने कोरोना व्हायरसचा धसका घेतला असताना ही भारतातही या व्हायरसचे ३० रूग्ण आढळले आहेत.त्यामुळे देशातही भीतीचे वातावरण आहे.बॉलीवूड ही याला अपवाद नाही.कोरोनाच्या धास्तीने अनेक चित्रपटांचे आणि मालिकांचे शूटींग थांबवण्यात आले आहे.या यादी मध्ये सलमान खान याचेही नाव आहे.होय, कोरोनाचा धोका बघता सलमानच्या 'राधे' या सिनेमाचे शूटींगही रद्द करण्यात आले आहे.'राधे' चे पुढील शूटींग थायलंडमध्ये होणार होते.पण कोरोना व्हायरसमुळे सलमानसह चित्रपटाच्या युनिटने थायलंडचे शूटींग शेड्यूल रद्द केले आहे.नुकतीच सलमानने कोरोना व्हायरसबद्दलची एक पोस्ट शेअर केली होती.आपला एक शर्टलेस फोटो शेअर करत,कोरोनापासून बचाव करण्यासाठी काय करावे हे त्याने सांगितले होते.'नमस्कार,आपल्या संस्कृतीला नमस्ते आणि सलाम आहे.कोरोना नष्ट झाल्यानंतर एकमेकांना मिठी मारा,हात मिळवा,असे त्याने कॅप्शनमध्ये लिहिले होते.म्हणजेच इथून पुढे काही दिवस सलमान कुणाचीही गळाभेट घेणार नाही.सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर सध्या तो 'राधे' या सिनेमा मध्ये बिझी आहे.या सिनेमात तो दिशा पाटनीसोबत दिसणार आहे.प्रभु देवा हा चित्रपटात दिग्दर्शित करत असून २२ मे २०२० रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.


रणदीप हुड्डा, जॅकी श्रॉफ, गौतम गुलाटी हेही यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.बॉलिवूड कलाकारांनीही कोरोनाची धास्तीच घेतली आहे.अशात सगळेच स्टार्स काळजी घेताना दिसत आहेत.बॉलिवूड कलाकारांना कामानिमित्त देशाविदेशात फिरावेच लागते.शूटिंग आणि महत्त्वाची काम टाळणे शक्य नसले तरीही स्वत:चे या संसगार्पासून कसा बचाव करता येईल याची खबरदारी घेताना दिसत आहेत.एअरपोर्टवर सध्या कालाकार मास्क आणि हँडग्लब्ज घालून फिरताना दिसत आहे.यामुळे कोणत्याही वस्तूला किंवा व्यक्तीला स्पर्श झाला तरी त्याचा थेट परिणाम आरोग्यावर होणार नाही.कलाकारांना पाहिल्यावर चाहते गर्दी करतात त्यामुळे सेल्फी देण्यास नकार देत असून लांब कसे राहता येईल याची काळजी घेत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या