नीना गुप्तांची काय आहे कळकळीची विनंती...

Image may contain: 1 person, closeup
मुंबई, ता. ६ मार्च २०२० (प्रतिनिधी): ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता या कायमच प्रेक्षकांना त्यांच्या बहुविध रुपांनी अवाक् करतात.आव्हानात्मक भूमिका साकारत साचेबद्धतेला शह देण्याची त्यांची वृत्ती चाहत्यांना विशेष भावते.अशा या अभिनेत्रीकडून चाहत्यांना मुख्यत्वे मुलींना एक अत्यंत मोलाचा सल्ला देण्यात आला आहे.


सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत गुप्ता यांनी विवाहित पुरुषाच्या प्रेमात न पडण्याचा सल्ला दिला आहे.यामध्ये त्यांनी स्वत:चा अनुभवही शेअर केला आहे.विवाहबाह्य प्रेमसंबंधांची सुरुवात कशी होते.इथपासून त्यांनी या व्हिडिओची सुरुवात केली.ज्यामध्ये 'त्या' व्यक्तीच्या वैवाहिक नात्यातील तणावाने या प्रेमसंबंधांची सुरुवात होते हे व्हिडिओत त्यांनी सांगितलं.


सुरुवातीची ओळख,त्यानंतर प्रेमात पडणं.फिरायला जाणं,एकत्र वेळ व्यतीत करणं इथपर्यंत हे नातं येऊन पोहोचतं.पुढे अर्थातच अपेक्षा वाढतात आणि तुम्ही जेव्हा 'त्या' व्यक्तीशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करता तेव्हा मात्र त्याचं उत्तर तुम्हाला हादरवणारं असतं.प्रेमाच्या या नात्यात जेव्हा तुम्ही गुंतता तेव्हा समोरची व्यक्ती मात्र पाठ फिरवून निघालेली असते.ही सारी वास्तवातील परिस्थिती नीना गुप्ता यांनी मांडली.कधीही विवाहित पुरुषाशी प्रेमसंबंधांमध्ये अडकू नका असा विनंतीचा सूर त्यांनी आळवला.'मी हे यापूर्वी केलं आहे आणि या परिस्थितीचा सामनाही केला आहे.म्हणूनच मी तुम्हाला हे सांगतेय',असं म्हणणाऱ्या नीना यांनी ठामपणे त्यांचा मुद्दा सर्वांपुढे ठेवला.


खासगी आयुष्यात नीना गुप्ता यांनी काही आव्हानांचा सामना केला आहे.पण,या आव्हानांनी खचून न जाता त्यांनी मोठ्या धीराने चित्रपटसृष्टीक स्वत:ची वेगळी ओळख प्रस्थापित केली.नीना गुप्ता वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होत्या.त्यांना या नात्यातून मसाबा ही मुलगी सुद्धा आहे.मसाबा ही एक आघाडीची फॅशन डिझायनर आहे.विवियन रिचर्ड्स यांच्यासोबतचं त्यांचं नातं हे विवाहबंधनात अडकण्यापलीकडलं होतं.पुढे,विवेक मेहरा यांच्यासोबतच्या नात्यामुळेही नीना गुप्ता प्रकाशझोतात होत्या.

No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या