पुण्यात इंटरनॅशनल सेक्स रॅकेट उघड...

Image may contain: one or more people, people sitting, shoes and indoor
पुणे, 7 मार्च 2020 (Policekaka): पुणे शहरामध्ये इंटरनॅशनल सेक्स रॅकेट उघड झाले असून, पोलिसांनी युवतींची सुटका केली.

मॉन्टी उर्फ जगन्नाथ अर्यल हा एस्कॉर्टच्या माध्यमातून पुण्यात वेश्याव्यवसाय करवून घेतो, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. जगन्नाथ अर्यल याने एस्कॉर्ट नंबरवर बनावट ग्राहकाद्वारे संपर्क साधून एका परदेशी महिलेला शिवाजीनगरच्या जवळ असेल्या सेंच्युरियन हॉटेलमध्ये पाठवले होते. तिथे ही महिला सापडल्याने या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे.


पोलिसांना सापडलेली सदर पीडिता उझबेकिस्तान देशाची रहिवासी असून, तिची सुटका करण्यात आली. सदर महिलेकडून मिळालेल्या माहितीवरून बिझ्झ तमन्ना हॉटेल हिंजवडी फेस 1 येथून 5 पीडित महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. सदर 5 पीडित महिलांपैकी 1 उझबेकिस्तान, 1 कझाकिस्तान, 1 नेपाळ, 1 ओडिसा आणि 1 पंजाब येथील राहणाऱ्या आहेत.


सेक्स रॅकेटमध्ये सामील असलेल्या महिलांना तमन्ना हॉटेलमधून ताब्यात घेवून पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर 6 पीडीत महिलांना (2 उझबेकिस्तान, 1 कझाकिस्तान, 1 नेपाळ, 2 इतर राज्यातील) रेस्क्यू होम येथे ठेवण्यात आले आहे.


दरम्यान, नागपूरमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा दोन दिवसांपूर्वी पर्दाफाश झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या सेक्स रॅकेटमध्ये सुशिक्षित तरुणींचा सहभाग असल्याचं उघड झाले आहे. स्वतःचे महागडे हौस पूर्ण करण्यासाठी हायप्रोफाईल सेक्स रॅकेटमध्ये काम करणाऱ्या दोन तरुणींना गुन्हे शाखेने सोडवले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या