स्विगीच्या मॅनेजरसह ५ जणांवर गुन्हा...

Image may contain: text
पुणे, ता. ७ मार्च २०२० (प्रतिनिधी): ग्राहक असलेल्या महिला वकिलाची डिलिव्हरी बॉयकडून झालेल्या विनयभंगाबाबतची तक्रार करुनही कंपनीची बदनामी टाळण्यासाठी कारवाई न करणाऱ्या स्विगीच्या मॅनेजरसह ५ जणांविरुद्ध डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी डिलिव्हरी बॉय,स्विगी डॉट कॉमच्या बंगळुरु मुख्य कार्यालयाचे व्यवस्थापक,पुण्यातील व्यवस्थापक तसेच अन्य २ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी २१ वर्षाच्या महिला वकिलाने डेक्कन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पुण्यातील एका महिला वकिलाने स्विगी डॉट कॉमवर संपर्क साधून २४ जानेवारी रोजी एक ऑर्डर दिली होती.BMCC रोडवरील या महिला वकिलाच्या घरी रात्रीच्या ९:४५ वाजल्याचा सुमारास स्विगीचा डिलिव्हरी बॉय ऑर्डर घेऊन आला होता.ऑर्डर दिल्यानंतर त्याने फिर्यादींकडे पिण्यासाठी पाणी मागितले.त्या पाणी आणण्यासाठी स्वयंपाक घरात गेल्या.त्यावेळी त्याने अश्लिल वर्तन केले.पाणी घेऊन त्या पुन्हा बाहेर आल्या.तेव्हा त्याला त्या अवस्थेत पाहून त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न झाली.


झाल्या प्रकाराची त्यांनी स्विगी कंपनीच्या कस्टमर केअरला तातडीने फोन करुन कल्पना दिली.मात्र, कंपनीच्या व्यवस्थापकाने कंपनीची बदनामी होऊ नये,म्हणून कोणतीही कारवाई केली नाही.त्यामुळे या महिला वकिलाने न्यायालयात फिर्याद दाखल केली.न्यायालयाने या प्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास करावा व त्याचा अहवाल पाठविण्याचा आदेश डेक्कन पोलिसांना दिला आहे.त्यानुसार डेक्कन पोलिसांनी पाच जणांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.सहायक पोलीस निरीक्षक भागवत अधिक तपास करीत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या