करडे येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

Image may contain: 15 people, people standing
करडे, ता. ८ मार्च २०२० (तेजस फडके): आजच्या युगात स्त्रीयांनी शिक्षण,राजकारण,समाजकारण,शेती,उद्योग,विज्ञान,माहिती तंत्रज्ञान,आरोग्य,संगीत,क्रीडा अंतराळ,चित्रपट या सर्व क्षेत्रात यशाची उत्तुंग शिखरे गाठली असुन महिलावर्ग आज कुठेही मागे राहिलेला नाही.अलीकडे स्त्री सक्षमीकरण आणि स्त्री सबलीकरणा साठी विविध स्तरांवर प्रयत्न होत असुन "मुलगी शिकली प्रगती झाली" तसेच "बेटी बचाओ बेटी पढाओ हा मंत्र कायम लक्षात ठेवा असे प्रतिपादन माजी सरपंच रुपाली वाळके यांनी केले.करडे(ता.शिरुर) येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त "तू नारी,तू घे भरारी...व्यापून टाक क्षितिजे सारी... या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी अध्यक्षस्थानी माजी सरपंच रुपाली वाळके ह्या होत्या.यावेळी कार्यक्रमासाठी शिरुर पंचायत समितीच्या माजी उपसभापती मंगल लंघे,माजी सरपंच कविता जगदाळे,रूपाली वाळके,रुक्मिणी घायतडक,सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी लंघे, निशिगंधा कणकवलीकर तसेच गावातील अनेक महिला उपस्थित होत्या.आलेल्या महिलाभगिनी यांचं स्वागत आणि सत्कार समारंभ करून कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती माता आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.भैरवनाथ विद्यालयातील मधुरा ढवळे,श्रेया बांदल,पूजा घुले, जान्हवी वाळके,दीपिका देशमुख, ज्ञानेश्वरी रोडे,वैष्णवी आढाव,प्रणाली रोडे,कांचन लंघे या मुलींनी राष्ट्रमाता जिजाऊ,राणी लक्ष्मीबाई,सावित्रीबाई फुले,अहिल्याबाई होळकर यांच्या वेशभूषेत व्यासपीठावर येऊन त्यांच्या कार्याची माहिती दिली.


कार्यक्रमाच्या शेवटी खास महिलांसाठी संगीत खुर्ची हा कार्यक्रम घेण्यात आला. संगीत खुर्चीमध्ये रोहिणी वाळके,रूपाली वाळके व मंगल घायतडक.तर पाककलाकृती मोठा गट यामध्ये तेजस्विनी वाळके,सानिका टेंभेकर,कांचन फंड.तर छोटा गट यामध्ये तन्वी बांदल,अनुष्का वाळके,ऋतुजा देशमुख,जान्हवी बांदल,तर मुलांमध्ये पियुष जगदाळे आणि अमर पाचरणे यांचे बक्षीस देण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुषमा वालझाडे,सूत्रसंचालन शारदा मिसाळ आणि आभार मोहिनी शेलार यांनी व्यक्त केले.यावेळी प्राचार्य आर के ठाकूर,पी एस वाघचौरे,मंदा लोखंडे,तान्नूम मुलांणी,वर्षा पवार आणि निलेश पवार हे शिक्षक उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या