आज जागतिक महिला दिन...

Image may contain: 1 person
८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो.महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ म्हणून ८ मार्च या दिवशी जागतिक महिला दिवस साजरा केला जातो.

पहिल्यांदा सर्वप्रथम जागतिक महिला दिन हा २८ फेब्रुवारी रोजी न्यूयॉर्क येथे साजरा करण्यात आला.सण १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडलेल्या सूचनेनुसार ८ मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा करण्यात आला.संपूर्ण अमेरिका आणि युरोप सहित जवळजवळ जगभरातल्या स्रियांना विसाव्या शतकाच्या सुरुवाती पर्यंत महिलांना मतदानाचा हक्क नाकारण्यात आला.याला जबाबदार असणारी गोष्ट म्हणजे स्त्री पुरुष विषमता.या विषमतेमुळे स्रियांवर अन्याय होत होता.संपूर्ण जगात १९ व्या शतकाच्या अखेरपर्यंत सर्व स्रियांना दुय्यय दर्जाची वागणूक दिली जात होती.आजच्या युगात स्त्री ही शिक्षण राजकारण समाजकारण शेती,उद्योग,विज्ञान,माहिती तंत्रज्ञान,आरोग्य,संगीत,क्रीडा अंतराळ,चित्रपट या सर्व क्षेत्रात स्त्रीने यशाची उत्तुंग शिखरे गाठली आहेत.हिंदवी स्वराज्याची प्रेरणा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांना घडविणाऱ्या राष्ट्रमाता,राजमाता जिजाऊ तसेच स्वतःच्या पोटच्या मुलाला पाठीशी बांधून स्वातंत्र्यासाठी लढलेलया राणी लक्ष्मीबाई.ज्ञानाची गंगोत्री सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणाऱ्या सावित्रीबाई फुले."यदि मै इस देश की सेवा करते हुए मर भी जाऊ,मुझे इसका गर्व होगा" असे म्हणणाऱ्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी.पुण्यश्लोक या उपाधीने त्यांना संबोधले जाते त्या अहिल्याबाई होळकर.भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी.मानवता आणि शांतीचा संदेश देणाऱ्या मदर तेरेसा.माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर.समाजाने टाकुन दिलेल्या आणि स्वकीयांच्या प्रेमाला पारख्या झालेल्या,असंख्य निराधारांना आपल्या मायेच्या स्पर्शाने व प्रेमाने आपलेसे करणार्‍या अनाथांची माय सिंधुताई सपकाळ.भारतातील पहिल्या इंजिनियर व सामाजिक कार्यकर्त्या कुशल लेखिका व इन्फोसिस फाऊन्डेशनच्या  संस्थापिका सुधा मूर्ती पहिली भारतीय महिला अंतराळवीर कल्पना चावला या सर्व महिला असून देखील गरुडझेप त्यांनी आपापल्या क्षेत्रांमध्ये घेतलीआहे.


फक्त कष्ट चूल आणि मूल यांचे एकमेव साधन म्हणजे स्त्री होय.हा समाज सर्वसाधारणपणे रूढ होता.समाजात समानतेने वावरणे संपत्तीवरील अधिकार मतदान शिक्षण यांसारख्या अधिकारापासून स्रिया वंचित होत्या.१९ व्या शतकानंतर स्रियांवर होणारे अन्याय त्याचे हक्क याबाबत स्रियांमध्ये जागरूकता येऊ लागली.यातूनच स्त्रीवादाचा जन्म झाला.आजही आपण पाहतो की,मुलींवर स्रियांवर अत्याचार होतात.आजही ग्रामीण भागामध्ये स्रियांना कमी लेखले जाते.त्यांना कोणत्याही गोष्टीच स्वातंत्र्य नाही.पण अश्या काही महान स्रिया या जगात होऊन गेल्या की त्यांनी खूप महान कार्य केल.रक्ताच नात नसताना माणुसकीच्या नात्याने हजारो मुलींचा सांभाळ करणाऱ्या सिधुताई डोळ्यांसमोर आठवतात.आणि पहिल्या या प्रश्नाच उत्तर मिळत.मातृत्व कुठंतरी शिल्लक आहे.


अस म्हंटल जात "स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी" आपण सर्व जण ऐकतो.पण जर सिंधुताई सारख्या स्रिया या पृथ्वीवर जन्म घेत असतील  तर हे वाक्य नक्कीच चुकीच ठरु शकेल.कल्पना चावला,सुनीता विल्यम यांनी तर महिला आकाशाला गवसती घालू शकतात.हे दाखवून दिलं.स्वतःच्या वैयक्तिक दुःखाचा विचार न करता सगळ्या विश्वाच्या कल्याणासाठी ज्ञानेश्वरांनी ताठी उघडायला लावणाऱ्या मुक्ताबाई ह्या ही एक महिलाच ना...? साऱ्या जगात आपल्या भारताचा दबदबा निर्माण करणाऱ्या आपल्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी ह्या सुद्धा एक महिलाच ना...? अहो एवढंच काय स्वतःच्या दुःखाचा आणि आयुष्यातील सगळ्या वाईट घटनांचा विचारही न करता आपल्या पोटच्या गोळ्याला शिवबाला साऱ्या महाराष्ट्रावर ओवाळून टाकणाऱ्या जिजाबाई ह्या सुद्धा एक महिलाच ना...?  मग जर अशा महान स्रिया या समाजात जन्म घेणार असतील तर समाज सुधारल्या शिवाय राहणार नाही.भारतात मुंबई येथे पहिला जागतिक महिला दिन ८ मार्च हा दिवस १९४३ साली साजरा झाला.१९७१ साली ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता.महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो.

किरण दिपक पिंगळे
रांजणगाव गणपती
९३७३५४१३०८


No photo description available.


   

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या