घोड धरणात रात्रीच्या वेळेस वाळु उपश्याचा खेळ चाले...

Image may contain: sky, outdoor, water and nature

शिंदोडी, ९ मार्च २०२० (तेजस फडके): शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्याला सिंचनासाठी वरदान ठरलेल्या घोड धरणात गेल्या अनेक दिवसांपासून यांत्रिक बोटींच्या मदतीने प्रचंड मोठ्या प्रमाणात वाळु उपसा  चालू असुन घोड धरणाची चाळण होत आहे.काही दिवसांपूर्वी शिरुरच्या तहसीलदार लैला शेख यांच्या घराबाहेर वाळुमाफियांनी रेकी करत पाळत  ठेवली होती.त्यातले २ आरोपी शोधण्यास अजुनही शिरुर पोलिसांना यश आलेले नाही.त्यामुळे वाळुमाफिया पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत.घोड धरणात शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातील अनेक वाळुमाफिया सक्रिय असुन महसुल विभागाच्या कारवाईच्या भीतीने आता वाळुमाफीया रात्रीचा वाळु उपसा करत आहेत.त्यामुळे महसुल विभागाला पण कारवाई करताना अडचणी येत आहेत.वाळुमाफीया श्रीगोंदा तालुक्यातील वजनदार राजकीय नेत्याचेच कार्यकर्ते असल्याने त्या राजकीय नेत्याने शिरुर आणि श्रीगोंदा तहसिल कार्यालयातील महसुल विभागातील काही वरीष्ठ अधिकाऱ्यांशी "आर्थिक" तडजोड केल्यानेच महसुल विभाग कारवाईस टाळाटाळ करत  असल्याचे दिसत आहे.


शिरुर-हवेलीचे आमदार अ‍ॅड अशोक पवार यांनी घोड धरणातला वाळु उपसा पुर्णपणे बंद  व्हावा यासाठी महसुलच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सुचना दिल्या होत्या.त्यामुळे घोड धरणात  काही दिवस वाळु उपसा बंद राहिला.परंतु आता वाळुमाफीया रात्रीचे सक्रीय झाले असुन हे सगळे वाळुमाफीया श्रीगोंदा तालुक्यातील आहे.तसेच घोड धरणात वाळुउपसा करुन ती वाळु श्रीगोंदा तालुक्यातील माठ,राजापुर,म्हसे या गावच्या हद्दीत खाली केली जाते.शासनाचा करोडो   रुपयांचा महसुल बुडत असताना श्रीगोंदा महसुलविभाग याकडे कानाडोळा का करत आहे.असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
वाळु माफियांवर पोलिसांची जरब बसणार का...?
सध्या घोड धरणात प्रचंड मोठ्या प्रमाणात बेकादेशीररीत्या वाळु उपसा चालु आहे.महसुल विभागाने अनेकवेळा कारवाई करुनही वाळुमाफीया महसुल विभागाला घाबरत नाहीत.उलट महसुल विभागाच्या अधिकाऱ्यांना दम देणे त्यांच्यावर पाळत ठेवणे असे प्रकार वाळुमाफियांकडून वारंवार होतात.काही दिवसांपूर्वी शिरुरच्या तहसीलदार लैला शेख ह्या निमगाव दुडे येथे कारवाई साठी जाणार असल्याचे कळताच वाळुमाफीया पहाटे पासुनच त्यांच्यावर पाळत ठेऊन होते.तसेच महसुल विभागाच्या अधिकाऱ्यांचे लोकेशन समजण्यासाठी whats app सारख्या सोशल मीडियाचा वापर वाळुमाफीया करतात.तसेच पत्रकारांनी वाळुच्या बातम्या छापल्या की पत्रकारांना सुद्धा धमकी देण्याचे प्रकार घडत आहेत.त्यामुळे जर तालुक्याचे तहसिलदारच सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य माणसांच काय असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.त्यामुळे पोलिसांनी वाळुमाफियांवर कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे.


No photo description available.


Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या