सणसवाडी येथे बंद घर फोडून २ लाखांचा ऐवज लंपास...

Image may contain: indoor
शिक्रापूर, ता. ९ मार्च (प्रतिनिधी): सणसवाडी (ता. शिरूर) येथे घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी घरावर डल्ला मारीत सुमारे २ लाखांचा ऐवज लंपास केला आहे.याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे.शिक्रापूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये अनेक ठिकाणी चोऱ्या होत आहेत.उत्तम धूळगंड (रा. सणसवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.याबाबतची माहिती अशी की, धूळगंड दाम्पत्य कामानिमित्त बाहेर गावी गेले होते.त्यामुले त्यांचे घर बंद होते.हीच संधी साधून चोरट्यांनी त्यांचे घर फोडले.चोरट्यांनी कोरेगाव भीमा येथे ५ ते ६ ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या.तर यावेळी ६ चोरटे CCTV मध्ये कैद झाले.त्यांनतर २ दिवसांत पुन्हा सणसवाडी येथे चोरट्यांनी ४ घरे फोडली आहे.त्यामुळे चोरट्यांचा बंदोबस्त करणे पोलिसांपुढे आव्हान निर्माण झाले आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किरण भालेकर व पोलीस नाईक तेजस रासकर हे करीत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या