मुलीचा संसार उद्ध्वस्त करणाऱ्या आरोपी वडिलांचा मृत्यू ...

Image may contain: 2 people

तेलंगणा, ता. ९ मार्च २०२० : तेलंगणा राज्यात २०१८ मध्ये प्रणय पेरुमल्ला या तरुणाचं ऑनर किलिंग करण्यात आलं होतं.या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला होता.या प्रकरणातील मुख्य आरोपी मारुती राव यांचा मृतदेह हैदराबाद येथे आढळला आहे.या घटनेनंतर पोलिसांनी मारुती राव यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उस्मानिया रुग्णालयात पाठवला आहे.अद्याप मारुती राव यांच्या मृत्यूचे कारण समजू शकलेले नाही.पोलिसांनी वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार,मारूती राव याने आत्महत्या केली असावी.मारुती राव यांची मुलगी अमृताने एका दलित तरुणाशी लग्न केलं होतं.त्यामुळे अमृताचा पतीला म्हणजेच जावई प्रणय पेरुमल्ला याला ठार मारण्यासाठी मारुती राव याने १ कोटी रुपयांची सुपारी दिली होती.मुलीने आंतरजातीय विवाह केल्यामुळे मारुती राव यांनी प्रणयची हत्या केली होती.अमृता आणि तिचा पती १४ सप्टेंबर २०१८ मध्ये रुग्णालयात जात होते.त्यावेळी प्रणयवर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता.या हल्ल्यात प्रणयचा मृत्यू झाला होता.


विशेष म्हणजे हा सर्व प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला होता.या घटनेनंतर संपूर्ण देशातील वातावरण ढवळून निघाले होते.प्रणयच्या हत्येवेळी अमृता ही ५ महिन्यांची गरोदर होती.तिने एक गोंडस मुलाला जन्म दिला आहे.त्या दिवसापासून अमृताने वडील मारुती राव यांच्याशी सर्व नाते तोडले होते.आणि मारुती राव यांच्याशी प्रणयची हत्या झाल्यापासून एकदाही बोलले नसल्याची प्रतिक्रिया अमृताने प्रसारमाध्यमांना दिली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या