शिक्रापूर पोलीस ठाण्यात महिला दिन उत्साहात साजरा...

Image may contain: 6 people, people sitting, office and indoor
तळेगाव ढमढेरे, ता. ९ मार्च २०२० (एन.बी. मुल्ला): जागतिक महिला दिनानिमित्त शिक्रापूर पोलीस ठाण्याचा संपूर्ण कारभार महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी सांभाळला.शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पोलीस ठाण्यात आज रविवार (दि. ८ मार्च) रोजी  जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.पोलीस स्टेशनचे मुख्य ठाणे अंमलदार म्हणून महिला पोलीस हवालदार वंदना कांबळे यांनी कारभार पहिला असून त्यांना मदतनीस म्हणून गिता बराटे व रुपाली निंभोरे यांनी काम पहिले.तसेच बिनतारी संदेश साठी सीमा बोचरे आणि बिट मार्शल साठी ज्योती आहेरकर या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी दिवसभर पोलीस स्टेशनचे काम पाहिले.महिला दिनानिमित्त करंदीच्या पोलीस पाटील वंदना साबळे, महिला दक्षता कमिटीच्या सदस्या मंगल सासवडे यांनी सर्व महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान केला.यावेळी बोलताना ठाणे अंमलदार पोलीस हवालदार वंदना कांबळे यांनी सांगितले.की, पोलीस स्टेशन मधील आम्हाला नेमून दिलेले सर्वच काम आम्ही प्रामाणिकपणे पार पाडत असतो.


आज महिला दिनानिमित्ताने विशेष कारभार आमच्याकडे देण्यात आलेला असल्यामुळे आम्हाला वेगळाच आनंद मिळाला असून दिवसभरात आलेल्या सर्व तक्रारी, संदेश, यांसह पोलीस स्टेशनचे कोणते कर्मचारी कोणत्या कामासाठी कोठे रवाना झाले यांसह सर्व बाबींच्या नोंदी देखील चोखपणे नोंदवून ठेवल्या आहेत.तर आलेल्या सर्व नागरिकांसोबत चर्चा करून त्यांच्या तक्रारी जाणून घेण्याचे काम यावेळी या कारभार सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांनी केले आहे.अनेक महिलांनी मोकळ्या मनाने चर्चा केली असल्याचेही यावेळी पोलीस स्टेशनचे मुख्य ठाणे अंमलदार वंदना कांबळे यांनी सांगितले.महिला दिनानिमित्त पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांना एकत्र करत सर्व महिला, महिला पोलीस पाटील, महिला दक्षता कमिटीच्या सदस्यांचा पोलीस स्टेशनच्या वतीने सन्मान करण्यात आला आहे.


महिला पोलीस अधिकाऱ्यांची गरज
शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये महिलांवरील वाढते गुन्हे लक्षात घेता, या ठिकाणी महिला पोलीस अधिकाऱ्यांची गरज असल्याचे अनेक दिवसांपासून बोलले जात आहे.परंतु आज महिला पोलीस कर्मचारी पोलीस स्टेशनचा कारभार सांभाळत असताना येथे महिला पोलीस अधिकारी सक्षमपणे काम करत असल्याचे जाणवले असून कायमस्वरूपी एक महिला अधिकाऱ्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केल्या.


No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या