धोनीचा निर्णय झालाय आणि तो लवकरच जाहीर होईल...

Image may contain: 2 people
मुंबई, ता. १० मार्च २०२० (प्रतिनिधी): भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने निवड समितीशी चर्चा केली होती.त्याने आपल्या कारकिर्दीबाबत निर्णय घेतला असून ते समितीला सांगितलेला आहे.लवकरच तो जाहीर करेल.असे भारतीय संघाच्या निवड समितीचे माजी अध्यक्ष एम. एस. के. प्रसाद यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.अध्यक्षपदाची मुदत संपल्यानंतर आता प्रसाद यांनी याबाबत तोंड उघडले असून यापूर्वी माध्यमांशी बोलताना त्यांनी एकदाही धोनीबरोबरच्या चर्चेबाबत कोणताही खुलासा केला नव्हता.प्रसाद अध्यक्ष असताना त्यांनी वेळोवेळी संदिग्ध विधाने केलेली आहेत.तसेच त्यांच्या काही मतांवर समीक्षकांनीही टीका केली होती. संपूर्ण कारकिर्दीत धोनीबाबत एकदाही अधिकृतरीत्या मत प्रदर्शित न करता माध्यमांना पुसट माहिती देण्याची त्यांची भूमिका सातत्याने राहिली होती.त्यामुळे आता अध्यक्षपदाची मुदत संपल्यावर ते का बरळले याबाबतही प्रश्‍न निर्माण झाले आहेत.


दुसरीकडे भारतीय संघात पनरागमन करण्यासाठी धोनीने त्याचा आय.पी.एल. संघ चेन्नई संघाबरोबर सराव सत्रात सरावही सुरू केला आहे.जर धोनीने त्याच्या कारकिर्दीबाबत निर्णय घेतला होता व तो निवड समितीला सांगितला होता.तर अध्यक्षपदावर असतानाच प्रसाद यांनी त्याबाबत कधीच कोणतेच मत व्यक्त का केले नाही हा देखील भूवया उंचावणारा प्रश्‍न उभा ठाकला आहे.प्रसाद अध्यक्ष असताना त्यांनी वेळोवेळी संदिग्ध विधाने केलेली आहेत.तसेच त्यांच्या काही मतांवर समीक्षकांनीही टीका केली होती.


संपूर्ण कारकिर्दीत धोनीबाबत एकदाही अधिकृतरीत्या मत प्रदर्शित न करता माध्यमांना पुसट माहिती देण्याची त्यांची भूमिका सातत्याने राहिली होती.त्यामुळे आता अध्यक्षपदाची मुदत संपल्यावर ते का बरळले याबाबतही प्रश्‍न निर्माण झाले आहेत.भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री आणि निवड समितीचे नवनियुक्त अध्यक्ष सुनील जोशी हेच येत्या काळात त्याबाबत जाहीर वक्तव्य करतील असे सांगून प्रसाद यांनी चेंडू दुसऱ्या पारड्यात ढकलला आहे.

No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या