Video: एसएमएस आला अऩ् अलगद सापडला...

रांजणगाव गणपती, ता. १० मार्च २०२० (तेजस फडके): मोटार चोरी प्रकरणी नितीन शिवाजी दरेकर (वय २८) रा.चिलेवाडी, ता.आष्टी, जि.बीड) यास ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रांजणगाव गणपती (ता.शिरुर) येथुन दिपक ज्ञानेश्वर दौंडकर यांची होंडा अमेझ कार एम एच १४ डि एक्स २१८८ दि २० फेब्रुवारी रोजी चोरीस गेली होती. त्यानंतर त्यांनी सुमारे १५ दिवस कारची शोधाशोध करुनही ती सापडली नाही. त्यामुळे त्यांनी रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन मध्ये दि ७ मार्च रोजी तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करुन तपासाला सुरवात केली होती.


दुसऱ्याच दिवशी ८ मार्च रोजी  दिपक दौंडकर यांच्या मोबाईल वर चोरीला गेलेल्या गाडीवर "ई-चलनाद्वारे" दंड आकारल्याचा SMS आला.त्यानंतर दौंडकर यांनी तात्काळ हि बाब रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांना सांगितली.त्यामुळे पोलिसांनी या गोष्टीचा अधिक तपास करत असताना त्यांना "ई-चलन" द्वारे झालेली दंडाची कारवाई हि बीड शहर पोलिसांनी केल्याचे निदर्शनास आले. त्यावेळेस लगेचच बीड कंट्रोल रुमला माहीती देऊन ती कार आणि चालकाला त्याब्यात घेण्याबाबत कळविण्यात आले.


परंतु तोपर्यंत चोर ती कार घेऊन अंमळनेरच्या दिशेने निघुन गेला.त्यामुळे अंमळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेशकुमार डोंगरे यांना तातडीने संपर्क करुन माहीती दिली.त्यामुळे त्यांनी त्वरित हालचाली करुन नाकाबंदी करुन चोरी गेलेली कार आणि चालकाला ताब्यात घेतले.त्यानंतर रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी तात्काळ तपास पथक पाठवले आणि २४ तासाच्या आतच आरोपीला बेड्या ठोकल्या.


पोलीस दलामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढला असुन रांजणगाव MIDC पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करुन तात्काळ २४ तासाच्या आत आरोपीला बेड्या ठोकल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.सदरची कार्यवाही पुणे जिल्ह्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना,दौंड उपविभागीय पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांच्या आदेशानुसार रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस  उपनिरीक्षक शुभांगी कुटे, पोलीस नाईक अजित भुजबळ,गणेश सुतार,वाहतुक पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र वाघमोडे, पोलीस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, पोलीस कॉन्स्टेबल विजय शिंदे यांनी काम केले. पुढील तपास पोलीस नाईक गणेश सुतार करत आहेत.

No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या