HVDS मधून १२३७२ कृषीपंपांसाठी वीजजोडणीचे काम पूर्ण...

Image may contain: sky, cloud and night
बारामती, ता. ११मार्च २०२० (प्रतिनिधी): महावितरणच्या बारामती परिमंडलमध्ये उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे (HVDS) कृषिपंपांना नवीन वीजजोडणी देण्याचे काम सुरु आहे.आतापर्यंत बारामती मंडलमध्ये ३४६७ कृषिपंपांना नवीन वीजजोडणी देण्याच्या यंत्रणेची उभारणी पूर्ण झाली आहे.त्यापैकी ३२०८ कृषिपंपांची वीजजोडणी कार्यान्वित करण्यात आली आहे.HVDS द्वारे सोलापूर व सातारा जिल्हा तसेच बारामती मंडलमध्ये स्वतंत्र रोहित्रांसह नवीन वीजयंत्रणा उभारून सद्यस्थितीत १२,३७२ कृषिपंपांना नवीन वीजजोडणी देण्याचे काम पूर्ण झाले आहे.यापैकी सातारा जिल्ह्यात ३५०२, सोलापूर जिल्ह्यात ३९०९ आणि बारामती मंडलमध्ये ३२०८ अशा एकूण १०६१९ कृषिपंपांची नवीन वीजजोडणी HVDS द्वारे कार्यान्वित करण्यात आली आहे.

बारामती मंडल अंतर्गत बारामती, इंदापूर दौंड, शिरूर, पुरंदर व भोर (जि. पुणे) या तालुक्यांमध्ये मार्च २०१८ अखेर पैसे भरून प्रलंबित असणाऱ्या ४७७८ कृषिपंपांना वीजजोडणी देण्याचे काम सुरु आहे.यामध्ये ३४६७ रोहित्रांसह वीजयंत्रणा उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे.त्यापैकी ३२०८ कृषिपंपांची वीजजोडणी कार्यान्वित करण्यात आली आहे.


उच्चदाब वितरण प्रणाली (HVDS) द्वारे शाश्वत व सुरळीत वीजपुरवठा होणार आहे.उच्चदाब वाहिनी उपकेंद्रातून सर्किट ब्रेकरद्वारे नियंत्रित होत असल्याने वीज अपघाताचा धोका नाही.उच्चदाब वाहिन्यांवरील वीजप्रवाह कमी झाल्यामुळे आकडे टाकून वीजचोरी करता येणार नाही व वीजहानीमध्ये घट होईल.HVDS मधून  प्रत्येक रोहित्रावर १ किंवा २ कृषीपंपांचा वीजपुरवठा असल्यामुळे रोहित्र जळण्याचे प्रमाण नगण्य होईल.कृषिपंपधारकांनी विद्युत भाराच्या मागणीनुसार रोहित्रांची क्षमता ठरविण्यात येत आहे.या प्रणालीमध्ये १० केव्हीए, १६ केव्हीए व २५ केव्हीए क्षमतेचे रोहित्र वापरण्यात येत आहेत.

उच्चदाब वाहिनी ही ग्राहकाच्या विहिरीपर्यंत उभारण्यात येत असल्याने लघुदाब वाहिनी विरहित वीजजोडणी राहणार आहे.त्यामुळे कृषीपंपांना योग्य दाबाने वीजपुरवठा होणार आहे व रोहित्र नादुरुस्त होण्याचे प्रमाण सुद्धा अतिशय नगण्य राहणार आहे.प्रचलित पद्धतीनुसार कृषीपंपांना ६३ केव्हीए, १०० केव्हीए क्षमतेच्या वितरण रोहित्राद्वारे लघुदाब वाहिनीद्वारे वीजपुरवठा करण्यात येतो.


एका रोहित्रावर जवळपास १५ ते २० कृषीपंपांना वीजपुरवठा केला जातो.लघुदाब वाहिनीची लांबी अधिक असल्याने वीजचोरी होणे ,कमी दाबाने वीजपुरवठा होणे, रोहित्र अतिभारित होऊन नादुरुस्त होणे, तांत्रिक हानी वाढणे, रोहित्र वारंवार बिघडणे व वीजपुरवठा खंडित होणे आदी समस्यांवर HVDS प्रणालीद्वारे मात करणे शक्य होणार आहे.त्यामुळे कृषीपंपांना सुरळीत व शाश्वत वीजपुरवठा करण्यासाठी नवीन वीजजोडण्या HVDS  प्रणालीद्वारे देण्यात येणार आहेत.

No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या