महिलांचे कर्तृत्व पुरुषांच्या बरोबरीने...

Image may contain: 13 people, people standing
तळेगाव ढमढेरे, ता. ११ मार्च २०२० (एन. बी. मुल्ला): महिलांनी सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने कर्तृत्व सिद्ध केलेलं असल्याने महिला या अबला नसून सबला आहेत हे त्यांनी सिद्ध करून दाखविले असल्याचे प्रतिपादन माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांनी केले.
           विठ्ठलवाडी (ता.शिरुर) येथे जागतीक महिला दिनानिमित्त महिला मेळावा व भारत सरकार तर्फे नोटरी पदी नियुक्ती झाल्याबद्दल अ‍ॅड. संतोष गवारे यांचा नागरी सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार पाचर्णे बोलत होते.या कार्यक्रमात अ‍ॅड. संतोष गवारे यांचा माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या हस्ते जाहीर नागरी सत्कार करण्यात आला.


अ‍ॅड. गवारे यांनी याप्रसंगी बोलताना दिव्यांगांना एक वर्ष मोफत नोटरी करून देणार असल्याचे जाहीर केले.यावेळी सुमंतबापू हंबीर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग संघचालक संभाजी गवारे, अ‍ॅड. राजेंद्र उमाप, किसन गवारे, लोभाजी आल्हाट, रामराव दौंडकर यांनीही मनोगत व्यक्त केले.


या कार्यक्रमास शिरुर बाजार समितीचे संचालक राहुल गवारे, पुणे बाजार समितीचे संचालक बाळासाहेब चव्हाण, सरपंच ललिता गाडे, उपसरपंच तानाजी मारणे, राजाभाऊ शिंदे, रोहित खैरे, काळुराम गवारे, हिरामण गवारे, संदीप गवारे, रायचंद शिंदे, सुभाष जगताप, जयेश शिंदे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबाजी गवारे यांनी केले.रघुनंदन गवारे यांनी सूत्रसंचालन केले.तर दिलीप गवारे यांनी आभार मानले.

No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या