शिक्रापूरमध्ये महिला दिन अनोख्या पद्धतीने साजरा...

Image may contain: one or more people and people standing
तळेगाव ढमढेरे, ता. ११ मार्च २०२० (एन.बी. मुल्ला): आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून शिक्रापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक मातांचा सन्मान करण्यात आला.
         शिक्रापूर (ता. शिरुर) येथे अनोख्या पद्धतीने महिला दिन साजरा करण्यात आला.ज्या मातांनी शिक्षकांना घडवले आणि जे शिक्षक अनेक वर्षांपासून पिढया घडवण्याचे काम करत आहेत.त्या शिक्षकांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.परंतु, त्यांना घडविणाऱ्या मातांचा सन्मान सोहळा आयोजित करून एक अभिनव उपक्रम राबविण्यात आला.या सन्मान सोहळ्याचे आयोजन येथील शाळा व्यवस्थापन समितीने केले होते.

या कार्यक्रमात सावित्रा सातपुते,चंद्रभागा तांबे,सुगंधाबाई केदारी,रंजना शेवकर,लीला शिवरकर,कल्पना कोळपकर,रजनी जकाते,राधाबाई कड,सुमन  पडवळ, पुष्पलता सोलंकर,शालन टाकळकर,कांताबाई  बेंद्रे,मंगल डोंगरे,नजमा मोमीन,लीलावती जकाते,सीता डफळ,पुष्पा गावडे,कलावती गोडसे,मीना धुमाळ आदी मातांचा सन्मान करण्यात आला.


या कार्यक्रमास माजी उपसभापती जयमाला जकाते,सरपंच जयश्री भुजबळ,माजी सरपंच रामभाऊ सासवडे,उपसरपंच भगवानराव वाबळे,माजी उपसरपंच नवनाथ सासवडे,दत्तात्रय गिलबिले,ग्रामपंचायत सदस्य गौरव करंजे,विठ्ठलराव सोंडे,जयश्री दोरगे,पोलिस निरिक्षक विलासराव सोंडे,केंद्रप्रमुख रत्नमाला मोरे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब सासवडे,सदस्य गणेश  गायकवाड,सविता मोडे आदी उपस्थित होते.हा अनोखा सन्मान सोहळा  पाहताना खूप आनंद होत असल्याचे याप्रसंगी बोलताना रामभाऊ सासवडे यांनी सांगितले.


तर नवनाथ सासवडे यांनीही सदर संस्कारक्षम सोहळा शाळेत आयोजित केल्याबद्दल शाळेतील मुख्याध्यापक शैला कांबळे व सर्व शिक्षकांचे कौतुक केले.या कार्यक्रमात डॉ. प्रतीक शिंदे यांनी'महिलांचे आरोग्य व कोरोना व्हायरस'बाबत जनजागृतीपर व्याख्यान दिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण शिरसाट,अंजली कोळपकर व वासुदेव टाकळकर यांनी केले तर ग्रामपंचायत सदस्या जयश्री दोरगे यांनी आभार मानले.

No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या