समाजकार्यात युवकांनी स्वतःस झोकून द्यावे...

Image may contain: 15 people, people standing
तळेगाव ढमढेरे, ता. ११ मार्च २०२० (एन. बी. मुल्ला): सामाजिक क्षेत्रात काम करत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.मात्र, अनाथ, गोरगरीब व गरजूंना मदत केल्याचं समाधान हे अत्यंत सुखावह असते.त्यामुळे युवकांनी समाजहित डोळ्यासमोर ठेवून सामाजीक कार्यात स्वतःस झोकून देणे आवश्यक असल्याचे मत समता शिक्षण संस्थेचे संस्थापक प्रा. विलास वाघ यांनी केले.
        तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे समता शिक्षण संस्थेच्या वतीने महिला मेळावा व पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात प्रा. वाघ बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. उषा वाघ होत्या.या कार्यक्रमात शैक्षणिक, सामाजिक, धार्मीक, पत्रकारिता, राजकीय, उद्योग अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा 'पुरस्कार' देवून सन्मान करण्यात आला.

यावेळी भाजप शिक्षक सेलचे प्रदेशाध्यक्ष सुधीर बाळसराफ, समाजकल्याणचे लेखाधिकारी नागेश बुध्दिवंत, कुंडलिक कदम, सचिन बेंडभर, माजी सभापती आरती भुजबळ, श्रीकांत सातपुते, कैलासदादा नरके, विश्वास ढमढेरे, पोपटराव भुजबळ, संदीप ढमढेरे, पांडुरंग नरके, रमेश भुजबळ, नवनाथ कांबळे, बाळासाहेब ढमढेरे, सुदीप गुंदेचा, महेश भुजबळ, जयश्री नरके, डॉ. लक्ष्मण कदम आदी मान्यवर उपस्थित होते.


अध्यक्षीय भाषणात प्रा. उषा वाघ यांनी सांगितले.की, सामाजिक संस्था किंवा आश्रमशाळा सुरू करणे सोपे असते.मात्र, ग्रामस्थांचे सहकार्य असेल तरच ती संस्था नावारूपाला येते.तळेगावच्या आश्रमशाळेला ग्रामस्थांनी केलेली मदत ही बहुमोल आहे.त्यामुळे संस्थेचा नावलौकिक वाढला असून त्याचे श्रेयही सामूहिकरीत्या सर्व ग्रामस्थांनाच असल्याचेही प्रा. उषा वाघ यांनी सांगितले.


कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक अशोक वाडीले, विजया आहिरे, शशिकला खेडेकर, विजय भोर, केशव पवार, संदीप गोसावी, शंकर मुणोळी, शंकर शिंदे, निलेश देसले, बुधा बिराडे यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक वाडीले यांनी केले.संतोष देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.तर संदीप गोसावी यांनी आभार मानले.

No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या