शेतकऱ्यांना मिळणार दीड लाखांचे बिनव्याजी कर्ज...

Image may contain: people sitting, grass, tree, plant, outdoor and nature
पुणे, ता. १२ मार्च २०२० (प्रतिनिधी): शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डवर पीककर्जा व्यतिरिक्‍त १ लाख ६० हजार रुपयांचे बिनव्याजी कर्ज मिळणार आहे.आता हे मिळणारे कर्ज फक्‍त दुधाळ पशुधन, कुक्कुटपालन, शेळी, मेंढी आणि मत्स्यपालनासाठी मिळणार आहे.यासाठी शेतकऱ्यांना तालुका पशुधन विकास अधिकारी यांच्याकडे एक पानाचा अर्ज करायचा आहे.अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना आणि पशुपालकांना हे कर्ज तात्काळ मिळणार आहे.


केंद्र सरकारच्या धोरणानुसार आता पशुधनाबरोबर कुकुट, शेळी, मेंढी, मत्स्यपालनासाठी पीककर्जाप्रमाणे कर्ज उपलब्ध होणार आहे.कर्ज किसान क्रेडिट कार्डद्वारे उपलब्ध होणार आहे.या मिळणाऱ्या कर्जाची मर्यादा १ लाख ६० हजार एवढी असणार आहे.या कर्जासाठी शेतकऱ्यांनी आपल्या ७/१२ उताऱ्यासह वैयक्‍तिक माहिती, कुटुंबाची माहिती, पशुधनाची संख्या आदी माहितीचा एक पानी अर्ज पंचायत समितीमधील तालुका पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांच्याकडे सादर करावयाचा आहे.या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना आणि पशुपालकांना ५० ते ७५ टक्‍के अनुदानाच्या योजनेसाठी प्राथमिक भागभांडवल किसान क्रेडिट कार्डद्वारे मिळणार असून, १०० टक्‍के सवलतीमध्ये पशुपालन व्यवसाय सुरू करणे शक्‍य होणार असल्याची माहिती अतिरिक्‍त पशुसंवर्धन आयुक्‍त डॉ. धनंजय परकाळे यांनी दिली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या