शिक्रापुरात किरकोळ वादातून टेम्पो चालकाला मारहाण...

Image may contain: text
तळेगाव ढमढेरे, ता. १२ मार्च २०२० (एन. बी. मुल्ला): शिक्रापूर येथे अज्ञात युवकांनी एका टेम्पो चालकाला मारहाण करत मारहाणीत चालकाचा दात पाडला असल्याची घटना घडली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.           


शिक्रापूर (ता. शिरूर)  येथील चाकण चौकात मंगळवार (दि.१० मार्च) रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास टेम्पो चालक किशोर सरदार हे तंबाखू खात उभे असताना २ अज्ञात युवक तेथे आले आणि त्यांनी तू दारू पिलाय का असे म्हणून शिवीगाळ करू लागले.तेव्हा सरदार यांनी तुम्ही शिव्या का देता असे म्हटले असताना दोघांनी किशोर सरदार यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरवात केली.यावेळी मारहाण होत असताना सरदार यांच्या तोंडातील एक दात पडला.


तसेच मोबाईल व पाकीट देखील खाली पडले.दरम्यान दोघे अज्ञात युवक पळून गेले,तर सरदार यांचे मोबाईल व पाकीट तेथे सापडले नाही.याबाबत किशोर दादाराव सरदार (रा. वाघाळे, ता. शिरूर, जि. पुणे, मूळ रा. जनुना, ता. बुलढाणा, जि. बुलढाणा) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी २ अज्ञात युवकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अनिल जगताप हे करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या