या आजाराला नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी...

Image may contain: 17 people, people standing and indoor
तळेगाव ढमढेरे, ता. १२ मार्च २०२० (एन.बी.मुल्ला): कोरोना सारख्या आजाराने सर्वत्र धुमाकूळ घातलेला असताना अनेक अफवा पसरविल्या जात आहेत.मात्र,नागरिकांनी घाबरून न जाता अफवांवर विश्वास न ठेवता स्वतःची काळजी घेणे गरजेचे असल्याचे आवाहन शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे यांनी केले आहे.
          



शिक्रापूर (ता. शिरूर) येथे ग्रामपंचायतच्या वतीने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना बाबत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे बोलत होते.यावेळी शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.याप्रसंगी शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधीक्षक डॉ. वैजिनाथ काशीद, डॉ. सुरेश लवांडे, डॉ. मच्छिंद्र गायकवाड, डॉ. रवींद्र टेमगिरे, डॉ. राजेंद्र भुजबळ, डॉ. चंद्रकांत केदारी, डॉ. अविनाश रुके, डॉ. श्रीकांत साकोरे, डॉ. बापूसाहेब इंगळे, डॉ. विशाल व्यवहारे, डॉ. सुहास निकम, डॉ. प्रदीप गुंदेचा, डॉ. रामचंद्र हिवरकर, डॉ. उदय भापकर, डॉ. विनायक कावरे, डॉ. दातखीळे, प्रभारी सरपंच भगवान वाबळे, माजी सरपंच रामभाऊ सासवडे, माजी उपसरपंच नवनाथ सासवडे, सागर सायकर, दत्तात्रय गिलबिले, विश्वास मांढरे, राजेंद्र मांढरे, दिलीप कोठावळे, सुरेश थोरात आदी उपस्थित होते.


यावेळी बोलताना शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे यांनी सांगितले.की, नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेणे गरजेचे असून त्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, अन्न शिजवून खावे, पाणी उकळून प्यावे तसेच स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत प्रशासनाने जनजागृती करण्याचे आवाहन देखील यावेळी डॉ. राजेंद्र शिंदे यांनी केले. 


नागरिकांनी सर्दी, ताप, खोकला तसेच श्वासाला त्रास होत असेल तर जवळील डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे आवाहन शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधीक्षक डॉ. वैजिनाथ काशीद यांनी केले आहे.ग्रामपंचायतच्या वतीने कोरोनाबाबत आवश्यक ती जनजागृती करणार असल्याची ग्वाही माजी सरपंच रामभाऊ सासवडे यांनी दिली आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मच्छिंद्र गायकवाड यांनी केले तर माजी सरपंच रामभाऊ सासवडे यांनी आभार मानले.
No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या