शिरूर मधील पूर्व भागात अवैधरित्या दारूची विक्री जोमात...

No photo description available.
मांडवगण फराटा, ता. १३ मार्च २०२० (प्रमोल कुसेकर): शिरूर तालुक्‍याच्या पूर्व भागातील इनामगाव, तांदळी, मांडवगण फराटा, पिंपळसुट्टी येथे हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो.या ठिकाणी असलेल्या हॉटेलमध्ये अवैधरित्या दारूविक्री होत आहे.दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी येथील नागरिकांकडून होत आहे.पण पोलिस याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.उजनी धरणातील मासे खवय्यांना खाण्यासाठी मिळत आहे.शिरूर तालुक्‍यातील पूर्व भागांतील रस्त्याकडेला विनापरवाना हॉटेल टाकली आहेत.येथील हॉटेलमधून अवैध दारूची विक्री होत आहे.परिणामी मद्यपी अनेकदा मुख्य रस्त्यावरच पडलेले दिसतात.नागरिक दारू पिऊन गाडी चालवत असल्याचे पाहावयास मिळत आहे.त्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे.या परिसरात शाळा व महाविद्यालये असूनही पोलीस प्रशासन चुकीची भूमिका का घेत आहेत? असा प्रश्‍न येथील नागरिकांना पडला आहे.

नागरगाव, रांजणगाव सांडस, आंधळगाव, कुरूळी, वडगाव रासाई, गणेगाव दुमाला या गावांमध्ये गावठी दारू गावातील मुख्य चौकात विकली जात आहे. २६ जानेवारी २०१९ रोजी शिरूर तालुक्‍यात दारुबंदी होण्यासाठी ग्रामसभेत ग्रामपंचायतींकडून ठराव घेण्यात आले होते.त्या ठरावांना केराची टोपली दाखवले आहे.जुगार व मटका अशा अवैध धंद्यांवर काही दिवसांपूर्वी पोलिसांनी कारवाई केली असली तरीही हे व्यवसाय पुन्हा जोमाने सुरू झाल्याचे दिसत आहे.


तसेच हॉटेल परिसरात मद्यपी दारू पिऊन झाल्यानंतर दारूच्या बाटल्या त्याच ठिकाणी टाकत असल्याने बाटल्यांचा ढीग साचला आहे.या परिसरात सामाजिक शांतता भंग पावत आहे.अवैध धंदे करणाऱ्या हॉटेल चालकांची नावे राज्य उत्पादन शुल्क विभागाला नागरिकांनी कळविल्यास संबंधितांवर ताबडतोब कारवाई केली जाईल.एस. डी. झगडे, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग.

अवैध दारूबंदीची जबाबदारी राज्य उत्पादन शुल्क खात्याची आहे आणि त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.गावांमध्ये अवैध धंदे सुरू असल्यास ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील व बीट हवालदार यांनी संबंधितांना याबाबत माहिती देणे बंधनकारक आहे.संजय पाचंगे,अध्यक्ष क्रांतिवीर प्रतिष्ठान.


शिरूरच्या पूर्व भागात अवैध धंदे सुरू असतील तर त्याबाबत नागरिकांनी माहिती द्यावी.माहिती मिळताच अवैध धंद्यांवर कारवाई केली जाईल.बिरदेव काबुगडे,सहायक पोलीस निरीक्षक, शिरूर.

No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या