या कारणावरून पुढील काही दिवस अण्णांना भेटता येणार नाही

Image may contain: 1 person
अहमदनगर, ता. १३ मार्च २०२० (प्रतिनिधी): राळेगणसिद्धी येथे राज्यासह देशभरातून मोठ्या प्रमाणात जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे समर्थक व कार्यकर्ते येत असतात.तसेच जगात व भारतातही अनेक मोठ्या शहरात सध्या सर्वत्र कोरोनाच्या साथीने थैमान घातले आहे.त्यामुळे कोरोना या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी म्हणून पुढील काही दिवस अण्णांना त्यांच्या कार्यकर्त्यांना भेटता येणार नाही असे राळेगणसिद्धीचे माजी उपसरपंच लाभेष औटी यांनी बोलताना सांगितले.
 अण्णांना भेटायला येणाऱ्या लोकांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे.दररोज किमान शेकडो लोक पुणे, कोल्हापूर, सांगली, नाशिक, औरंगाबाद, मुंबई यासह देशातुन व विविध राज्यातुन लोक भेटायला येत असतात.देशभरातू व राज्यभरातून आलेल्या कोणत्याही कार्यकर्त्याची भेट अण्णा कधीच नाकारत नाही.त्यांचे असलेले प्रश्न समजावून घेतात तसेच त्यांना मार्गदर्शनही करत असतात.त्यानंतर आलेल्या प्रत्येकाला अण्णा त्यांच्या सोबत फोटोही काढून देतात.मात्र, सध्या कोरोना व्हायरचा प्रादुर्भाव अथवा त्रास अण्णांना व गावातील कोणत्याही नागरिकाला होऊ नये याकरिता ही खबरदारी घेण्यात आली असल्याचे औटी म्हणाले.

कोरोना हा संसर्गजन्य रोग असून हा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित होत असल्याने त्याचा धोका अधिक वाढला आहे.त्यामुळे गाव परिसर राज्य व देशातील लोकांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने खबरदारी म्हणून पर्यटकांनी कोरोना रोगाची सुधारणा होईपर्यंत राळेगणसिद्धीला येण्याचे टाळावे अशी प्रेमाची विनंती करण्यात येत आहे.त्याचप्रमाणे सर्व नागरिकांना न घाबरता या रोगाला धैर्याने तोंड देण्यासाठी जे जे पथ्य सांभाळावे लागतात ते सांभाळावे म्हणजे या रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही


अण्णा हजारे यांनी एक पत्रक काढले असुन त्यात  राळेगणसिद्धी येथे ग्रामविकासाचे कार्य पाहण्यासाठी देशातील विविध राज्यातून व महाराष्ट्र राज्यातून त्याचप्रमाणे विदेशातून पर्यटक येत असतात.सध्या जगभर कोरोना हा संसर्गजन्य रोग पसरत आहे.आपल्या भारतातही कोरोना व्हायरसने प्रवेश केला आहे.महाराष्ट्र राज्यात ह्या रोगाने शिरकाव केलेला आहे.कोरोना हा संसर्गजन्य रोग असल्याने आणि जीवघेणा असल्याने संसर्ग होऊ नये यासाठी आम्ही राळेगणसिद्धी परिवाराने निर्णय घेतला आहे की हा रोग आटोक्यात येत नाही.तोपर्यंत राळेगणसिद्धीमध्ये पर्यटकांनी येऊ नये.आज पर्यंत राळेगणसिद्धी येते १६ लाखापेक्षा जास्त पर्यटक राज्य व देशविदेशातून आलेले आहेत.


विशेषतः अण्णा हजारेंशी फोटो काढून घेण्याची पर्यटकांच्या अपेक्षा असते.कोरोना हा संसर्गजन्य रोग असून हा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित होत असल्याने त्याचा धोका अधिक वाढला आहे.त्यामुळे गाव परिसर राज्य व देशातील लोकांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने खबरदारी म्हणून पर्यटकांनी करोना रोगाची सुधारणा होईपर्यंत राळेगणसिद्धीला येण्याचे टाळावे अशी प्रेमाची विनंती करण्यात येत आहे.त्याचप्रमाणे सर्व नागरिकांना न घाबरता या रोगाला धैर्याने तोंड देण्यासाठी डॉक्टरांनी जे जे पथ्य सांभाळन्यासाठी सांगितले आहेत ते सांभाळावे म्हणजे या रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही.
No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या