पूर्व हवेलीमध्ये सांडपाणी उपसण्याचा धंदा ?

Image may contain: outdoor and water
वाघोली, ता. १३ मार्च २०२० (प्रतिनिधी): हवेली तालुक्‍यात विविध परिसरातून सांडपाण्याचा उपसा करून ते ओढ्या-नाल्यांत किंवा मोकळ्या जागेत सोडण्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढत असून हा अनोखा धंदा पूर्व हवेलीतील उपनगरांत तेजीत चालला आहे.याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असून यातून मोठी उलाढाल होत असल्याची चर्चा आहे.व्यावसायिकरित्या सांडपाण्याचा उपसा करून ते उघड्यावर सोडणाऱ्यांवर कारवाई करावी,अशी मागणी नागरिकांकडून होत असताना प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.मोकळ्या जागेत असे सांडपाणी सोडले जात असल्याने संबंधीत ठिकाणच्या विहिरींचे पाणीही दूषित होऊ लागले असून यामुळे वर्षानुवर्षे पिण्याच्या पाण्यासाठी वापर होणाऱ्या विहिरीही आता निरूपयोगी ठरू लागल्या आहेत.


यावर, प्रशासनाकडून काणाडोळा केला जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.सांडपाणी उघड्यावर सोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.हवेलीच्या गटविकास अधिकाऱ्यांना पाण्याचे दूषितीकरण होणार नाही आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न उद्‌भवणार नाही.याबाबत योग्य ती पावले उचलण्याबाबत सूचना करण्यात येत आहेत.नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न तातडीने सोडविण्यात येईल.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या