शिरूर तालुक्यातील 'या' रस्त्यांची होणार कामे...

Image may contain: sky, tree, outdoor and nature
शिरूर, ता. १३ मार्च २०२० (प्रतिनिधी): आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या अकरा कामांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ३४ कोटी ७० लाखांचा निधी मंजूर झाला.ग्रामपंचायती व ग्रामस्थांच्या मागणीनुसार कामांसाठी पाठपुरावा केला होता.निविदा प्रक्रियेनंतर कामांना सुरुवात होईल,अशी माहिती कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.कामाचे नाव व मंजूर रक्कम शिक्रापूर पिंपळे खालसा हिवरे फाकटे चांडोह (ता. शिरूर) राज्यमार्ग ११७ ला मिळणारा रस्ता हिवरे गावाजवळ स्लॅब ड्रेन व मोऱ्याचे बांधकाम ७० लाख रुपये,शिक्रापूर गणेगाव खालसा ते मलठण टाकळी हाजी वडनेर प्रजीमा ५१ (ता. शिरूर) वाघाळे ते मालठण रस्त्याचे रुंदीकरण- २ कोटी,खडकी ते बेलसरवाडी व सविंदणे तालुका हद्द रस्ता २ कोटी, पिंपरी दुमाला-गणेगाव खलसा.


पिंपळे खालसा-रामा १२८ ते पिंपरी दुमाला- २ कोटी ५० लाख, भीमाशंकर-मंचर रस्ता राज्यमार्ग क्र. ११२ नारोडी फाट्याजवळ पुलाची पूर्णबांधणी करून रस्त्याचा चढ सुधारणा करणे.३ कोटी, वैदवाडी ते ज्ञानमंदिर, धामणी ते शिरदाळे रस्ता-३ कोटी ५० लाख, कुरवंडी ते घोडेगाव रस्ता सुधारणा-४ कोटी, मलठण ते जांबूत रस्त्याचे मजबुतीकरण व सुधारणा-४ कोटी, डिंभे ते फुलवडे रस्ता सुधारणा ४ कोटी, अवसरी बुद्रुक ते मेंगडेवाडी ते बेटवस्ती, पारगाव ते तालुका हद्द रस्ता सुधारणा (ता. आंबेगाव)४ कोटी, तळेघर ते पोखरी व जोगविहीर फाटा ते थोरांदळे रस्ता सुधारणा ५ कोटी.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या