राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातुन मंगलदास बांदल निलंबित...

Image may contain: 1 person
शिरुर, ता. १४ मार्च २०२० (प्रतिनिधी): पुण्यातील प्रसिद्ध सराफाला व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देऊन ५० कोटी खंडणीची मागणी केल्याप्रकरणी संशयाच्या भोवर्‍यात असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातुन निलंबित करण्यात आले आहे.मंगलदास बांदल यांच्याविषयी गेले २ ते ३ दिवसांपासून खंडणीची मागणी केल्याच्या बातम्या वृत्तपत्रातुन तसेच प्रसार माध्यमांमधून प्रसिद्ध होत असल्याने पक्षाकडुन त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.मंगलदास बांदल यांच्यावर झालेल्या खंडणीच्या आरोपामुळे राष्ट्रवादी पक्षाची बदनामी होत आहे.त्यामुळे त्यांना पक्षातुन निलंबित करण्यात येत असल्याचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी आज प्रसिद्ध केले आहे.त्यामुळे आता मंगलदास बांदल यांची नेमकी काय भुमिका असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.शिरुर आणि हवेली तालुक्यात मंगलदास बांदल यांना चांगलंच राजकीय वलय आहे.त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत.याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी मंगलदास बांदल यांना फोन केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या