पान टपरीतून चोरीस गेला गुटखा, गुन्ह्यात दाखवली तंबाखू...

Image may contain: text that says 'CRIME'
शिक्रापूर, ता. १५ मार्च २०२० (प्रतिनिधी): सणसवाडी (ता. शिरूर) येथील चौकातील पान टपरी चालकाच्या मालाची खोली फोडून मुद्देमाल चोरून नेणाऱ्या दोघांना शिक्रापूर पोलिसांनी अटक केली आहे.पान टपरीच्या मालातून गुटखा चोरी गेलेला असताना गुन्ह्यामध्ये तंबाखू दाखविल्याचा देखील प्रकार घडला असल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे.आमरजित मथुरासिंग सिंह (वय २०), आकाश कैलास पाटोळे (वय २२, दोघे रा. सणसवाडी, ता. शिरूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.संजयकुमार श्रीराम यादव (रा. सणसवाडी) यांनी गुरुवारी (दि. १२) फिर्याद दिली होती.याबाबतची माहिती अशी की,सणसवाडी येथील संजयकुमार यादव यांची पानटपरी आहे. या टपरीमध्ये तंबाखू, सिगारेट,बिडी आदी साहित्य विक्री केले जाते.


यादव हे दररोज सायंकाळी टपरीतील शिल्लक माल घरी घेऊन जाऊन घराशेजारी असलेल्या खोलीमध्ये ठेवत नेहमीप्रमाणे संजयकुमार यादव यांनी (दि. २४) जानेवारी टपरी बंद करून टपरीतील माल घराशेजारील खोलीत ठेवून झोपले.पहाटेच्या सुमारास खोलीतील ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी गेला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. २४ जानेवारी रोजी घडलेल्या घटनेचा गुन्हा पोलिसांनी शुक्रवारी (दि. १२) म्हणजेच तब्बल २ महिन्यांनी नोंदवला असल्याचे निदर्शनास आल्याने गुन्हा नोंदविण्यास विलंब का लावण्यात आला? असा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बाळासाहेब थिकोळे करीत आहेत.या घटनेमध्ये तब्बल ३० हजारांचा तंबाखू चोरी गेल्याचे दाखविले आहे.मात्र, पान टपरीमध्ये इतकी तंबाखू असणे शक्‍य नसून गुटखा चोरी गेलेला असताना पोलिसांनी तंबाखूची चोरी गेल्याचे दाखविले आहे.

No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या