राष्ट्रवादीकडून शिवसेनेवर कुरघोड्यांचे राजकारण...

Image may contain: text that says 'शिवसेना'
पुणे, ता. १५ मार्च २०२० (प्रतिनिधी): राज्यात आम्ही सत्तेत आहोत.मात्र, मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून शिवसेनेवर कुरघोड्या सुरू असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेनेचे उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला आहे.पश्‍चिम महाराष्ट्र आणि पुणे जिल्ह्यामध्ये शिवसेनेला मरगळ आल्याचेही त्यांनी नमूद केले.


पुणे जिल्ह्यातील २१ विधनासभा मतदासंघांपैकी एकाही मतदारसंघात शिवसेनेचा आमदार नाही.तर लोकसभा मतदारसंघात केवळ मावळमध्ये शिवसेनेचे खासदार आहेत.त्यामुळे जिल्ह्यात शिवसेनेचे प्रस्थ आबाधित राहावे यासाठी शिवसेनेचे उपनेते तथा शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना शिवसेनेकडून राज्यसभेवर पाठवले जाईल,असा विश्‍वास शिवसैनिकांना होता.मात्र, शिवसेनेकडून नुकतीच राज्यसभेसाठी प्रियंका चतुर्वेदी यांना उमदेवारी दिली आहे.

राज्यसभेचे तिकीट न मिळाल्याने मी नाराज नसून शिवसेना पक्षप्रमुखांचा निर्णय योग्य असल्याचे आढळरावांनी जाहीर केल्याने ते नाराज असल्याच्या केवळ वावड्याच ठरल्या आहेत. जरी ते नाराज नसले तरी शिवसेनेसोबत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसवर त्यांनी निशाणा साधला आहे.कॉंग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या प्रियांका चतुर्वेदी यांना शिवसेनेने राज्यसभेची उमेदवारी दिली.चतुर्वेदी यांना उमेदवारी दिल्याने शिवसेनेतील इच्छुक नाराज झाले आहेत.गुरुवारी (दि. १२) चंद्रकांत खैरे यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली.तसेच जिल्ह्यातील कामांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आडकाठी आणली जात असल्याने आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीवर तोफ डागत जिल्ह्यात शिवसेनेची होणारी तगमग समोर आणली आहे.ते म्हणाले की, सरकार आमचे आहे असे म्हणायच आणि आम्हीच अन्याय सहन करायचा.राष्ट्रवादीकडून होत असलेल्या अन्यायाबाबत आम्ही पक्षप्रमुखासोबत आम्ही चर्चा देखील केली आहे.त्यांची बाजू आम्ही समजून घेऊ शकतो.कारण सरकारला आताच कुठे १०० दिवस पूर्ण झाले आहेत.त्यामुळे आम्ही काही दिवस प्रतीक्षा करू, असे त्यांनी सांगितले.


राष्ट्रवादीकडून शिवसेनेच्या कामांमध्ये आडकाठी आणण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले असल्याने महाविकास आघडीत सगळ काही अलबेल असल्याचा 'आव' आणला जात आहे का,असा प्रश्‍न आता राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जात आहे.मला राज्यसभेची उमेदवारी मिळाली नाही म्हणून मी नाराज नाही.राज्यसभेवर शिवसेनेकडून प्रियंका चतुर्वेदी याची निवड झाली आहे.त्यांच मी अभिनंदन करतो.मी राज्यसभेसाठी इच्छुक नव्हतो.तसे मी संजय राऊत यांना आधीच सांगितले होते.
No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या