पिंपरी चिंचवडमध्ये पुढील २ तासांत जमावबंदी लागू होणार ?

Image may contain: 1 person, standing and outdoor
पिंपरी चिंचवड, ता. १६ मार्च २०२० (प्रतिनिधी): कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये पुढील २ तासांत जमावबंदी लागू करण्यात येणार आहे.त्यासाठी जमावबंदीबाबत पोलीस आयुक्त कार्यालयात ड्राफ्टचं काम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.सध्या पिंपरी चिंचवडमध्ये बाधित रुग्णांची संख्या ९ वर पोहचली आहे.या सर्वाना भोसरीतील नव्या रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.न्यूज १८ लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, पुण्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या १६ वर पोहोचली आहे.यातील पुण्यात ७ तर पिंपरी चिंचवडमध्ये ९ रुग्ण आहेत.तर पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल २७८ रुग्णांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत.सर्व रुग्ण ठणठणीत असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.त्यामुळे  कोणत्याही अफवांना बळी न पडता आपल्या आरोग्याची काळजी घ्या.


हा जीवघेणा आजार नसून त्याच्या उपचार केल्यानंतर तो बरा होईल अशा सुचना प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत.तर सुरक्षेसाठी आजपासून ३ दिवस प्रसिद्ध तुळशीबाग परिसरातील दुकाने बंद राहणार आहे. सर्व व्यापाऱ्यांनी हा उत्स्फूर्त निर्णय घेतला आहे.पुण्यात काही ठिकाणी संचारबंदी लागू करा (२०० ते ५०० मीटर) असा पालिका आयुक्तांचा कलेक्टर यांच्याकडे प्रस्तावही देण्यात आला आहे.त्यावर काय निर्णय होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या