काय आहे मुख्याध्यापक संघाची मागणी...

No photo description available.
तळेगाव ढमढेरे, ता. १६ मार्च २०२० (एन. बी. मुल्ला): कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथ प्रतिबंद कायदा राज्यात लागू केला आहे.शासनाने या कायद्याची अंमलबजावणी म्हणून सध्या महानगरपालिका, नगरपालिका, आणि नगरपरिषद हद्दीतील सर्व शैक्षणिक संस्था ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे.त्यामुळे शहरी विभागातील सर्वच प्राथमिक माध्यमिक आणि विविध महाविद्यालये बंद झाली आहेत.



जास्तीचा प्रसार होऊ नये म्हणून ग्रामीण भागातीलही सर्व शैक्षणिक संस्था बंद करण्याची मागणी पालकांकडून होत असल्याची माहिती पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे सहसचिव मारुती कदम यांनी दिली.
            



शहरालगत आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळांना लागून असणाऱ्या शाळांमध्ये आणि गावांमध्ये अनेक पालक, शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ शहरातून येत असल्याने संघाने चिंता व्यक्त केली आहे.सध्या कोरोना बाधीत रुग्णसंख्या वाढत आहेत.त्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना आणि खबरदारी म्हणून जिल्यातील सर्वच शाळा बंद ठेवल्या जाव्यात असे मत सहसचिव मारुती कदम यांनी व्यक्त केले.

Image may contain: text that says 'भाषण करायला शिका... लाखो लोकांसमोर निर्भयतेने बोला! Art of Speech मो.नं. 9860927799 9615927799 प्रभावी वक्तृत्वाचा पासवर्ड... फक्त इथेच!'

शिरुर तालुक्यात औद्योगिकरण फार मोठ्या प्रमाणावर झालेले आहे.त्यामुळे अनेक गावांची लोकसंख्या वाढली आहे.शहरातून आणि इतर राज्यातील बरेच कामगार आलेले आहेत.लोकसंख्या पाहता आणि सर्वंच शाळांमध्ये एकसूत्रीपणा येण्यासाठी एकाच वेळी बंद करणे सोयीचे ठरेल.त्यामुळे कोरोना रोगावर नियंत्रण आणता येईल अशी मागणी शिरुर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तुकाराम बेनके यांनी केली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या