तळेगाव ढमढेरे येथील या कारणावरून केला युवकांचा सत्कार

Image may contain: 10 people, people standing
तळेगाव ढमढेरे, ता. १७ मार्च २०२० (एन. बी. मुल्ला):  नागरिकांनी स्वतःच्या तसेच शेजारच्यांच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी तसेच चोरीच्या प्रकारांवर आळा बसविण्यासाठी जागरूक व दक्ष राहणे गरजेचे असल्याचे मत पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी व्यक्त केले आहे.
          



तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील एटीएम अज्ञात चोरटे फोडत असताना काही युवकांनी त्यांचा ATM चोरीचा डाव हाणून पाडला व पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने पाठलाग करून त्या ATM चोरीतील एकाला दुचाकीसह ताब्यात घेतले.युवकांनी दाखविलेल्या दक्षतेमुळे विजय काळूराम लोखंडे, अजित नामदेव सासवडे तसेच चोरट्यांचा पाठलाग करणारे पोलीस शिपाई हरिश्चंद्र शितोळे यांचा पोलीस स्टेशनच्या वतीने सन्मान करण्यात आला.

Image may contain: text that says 'भाषण करायला शिका... लाखो लोकांसमोर निर्भयतेने बोला! Art of Speech मो.नं. 9860927799 9615927799 प्रभावी वक्तृत्वाचा पासवर्ड... फक्त इथेच!'

याप्रसंगी पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार बोलत होते.यावेळी उद्योजक प्रशांत सासवडे, बबलू मांढरे, हारून इनामदार, दत्ता भुजबळ, पोलीस नाईक ब्रम्हा पोवार, विलास आंबेकर, हेमंत इनामे आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना नागरिकांनी दाखविलेली जागरूकता नक्कीच कौतुकास्पद असून या युवकांमुळे आरोपी पकडण्यात यश आले आहे.



तसेच या आरोपींकडून अजूनही काही गुन्हे उघड होण्याची शक्यता असल्याचे सांगत पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व नागरिकांनी जागरूक राहत आपल्या आणि शेजारच्यांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी पुढे येत पोलिसांना मदत करण्याचे आवाहन देखील पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी केले आहे.पोलीस नाईक ब्रम्हा पोवार यांनी सर्वांचे आभार मानले.



Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या