कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक संघटनांनी केली ही मागणी

Image may contain: 4 people, people standing and people sitting
तळेगाव ढमढेरे, ता. १७ मार्च २०२० (एन.बी. मुल्ला):  कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीतील शाळा बंद ठेवणेबाबत निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांना विविध शिक्षक संघटना व मुख्याध्यापक संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.

        

पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ, शिरूर तालुका मुख्याध्यापक संघ, शिरूर तालुका माध्यमिक शिक्षक संघ, शिक्षक लोकशाही आघाडी, शिरूर हवेली शिक्षण संस्था आणि शिक्षकेतर संघटना यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांना देण्यात आलेल्या निवेदनानुसार कोरोना विषाणूंचा संसर्ग लक्षात घेता पुणे जिल्ह्यात हा संसर्ग जास्त असून जिल्ह्यात बाधित रुग्ण १६ आहेत.

Image may contain: text that says 'भाषण करायला शिका... लाखो लोकांसमोर निर्भयतेने बोला! Art of Speech मो.नं. 9860927799 9615927799 प्रभावी वक्तृत्वाचा पासवर्ड... फक्त इथेच!'

विषाणूंचा फैलाव नियंत्रित करण्यासाठी राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका व नगरपरिषद हद्दीतील सर्व शाळा, महाविद्यालये ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.परंतु, ग्रामपंचायत हद्दीतील शाळा, महाविद्यालये मात्र बंद ठेवण्याचे आदेश नाहीत.ग्रामीण भागातील पालकांचे शाळांना वारंवार फोन येत असून कोरोना संसर्गाच्या भीतीपोटी विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याची जोखीम घेत नसल्याने गैरहजेरीचे प्रमाणही वाढत आहे.तर काही शिक्षक देखील पुण्याहून ग्रामीण भागातील शाळांमध्ये अध्यापनाचे काम करण्यासाठी रोज प्रवास करत असतात.ग्रामीण भागातील औद्योगिक क्षेत्रात रोज पुण्याहून कामगार येत असतात.त्यामुळे विषाणूंचा फैलाव होण्याची शक्यता असल्याने आरोग्य विषयक खबरदारीची उपाययोजना लक्षात घेता.ग्रामीण भागातील शाळांनाही सुट्टी देण्याची मागणी शिक्षक संघटनानी केली आहे.याप्रसंगी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या