रांजणगावला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; ट्रकची विक्री...

Image may contain: text that says 'CRIME'

रांजणगाव गणपती, ता. 18 मार्च 2020
(PoliceKaka): श्री गणेशा पेट्रोलपंपाजवळ शनिवारी (ता. 14) दुपारी अंदाजे पन्नासवर्षीय व्यक्ती मृतावस्थेत आढळली असून, या व्यक्तीची ओळख पटली नाही. रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


श्री गणेशा पेट्रोलपंपाचे व्यवस्थापक अमोल दत्तात्रेय साकोरे यांनी याबाबत पोलिसांना कळविले. पेट्रोलपंपाशेजारील बोअर वेलजवळ हा मृतदेह आढळून आला. मृत व्यक्तीच्या अंगात काळी नाईट पॅन्ट व मळकट लाल रंगाचा चौकडींचा फूल बाह्यांचा शर्ट आहे. मृताची उंची अंदाजे 160 सेंटिमीटर असून, वर्ण सावळा आहे. सडपातळ बांधा असून, पुढील दोन दात ओठांच्या बाहेर आहेत.


या वर्णनाच्या व्यक्तीबाबत माहिती असल्यास रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाणे (दूरध्वनी क्र. 232139) किंवा सहायक पोलिस निरीक्षक प्रफुल्ल कदम (मोबाईल क्र. 9552574188) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.


ट्रकची विक्री करून फसवणूक...

भाडेतत्त्वावर चालवायला दिलेल्या सुमारे 36 लाख रुपये किमतीच्या "हायवा' ट्रकची विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी व याबाबत जाब विचारला असता ठार मारण्याची धमकी देणाऱ्या तिघांविरुद्ध शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
अजय शेळके व मोनू शेळके (दोघे रा. नारायणगव्हाण, ता. श्रीगोंदा, जि. नगर) व राजू पाचर्णे (रा. पाचर्णे मळा, शिरूर) यांच्याविरुद्ध अपहार, फसवणूक व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. ते फरार झाले आहेत. बंडू पांडुरंग कोळपे (रा. हंगेवाडी, ता. श्रीगोंदा, जि. नगर) यांनी याबाबत फिर्याद दिली.

Image may contain: text that says 'भाषण करायला शिका... लाखो लोकांसमोर निर्भयतेने बोला! Art of Speech मो.नं. 9860927799 9615927799 प्रभावी वक्तृत्वाचा पासवर्ड... फक्त इथेच!'

फिर्यादी कोळपे यांचे बंधू आबा पांडुरंग कोळपे हे जुने शिरूर येथे तीन वर्षांपासून राहात असून, त्यांनी 30 एप्रिल 2019 रोजी हायवा हा मोठा ट्रक फायनान्स कंपनीमार्फत कर्ज काढून व्यवसायाकरिता घेतला होता. दहा मे रोजी हा ट्रक त्यांनी अजय शेळके, मोनू शेळके व राजू पाचर्णे यांना प्रतिमहिना एक लाख ऐंशी हजार रुपये भाडेतत्त्वावर दिला होता. सुरुवातीच्या महिन्याचे भाडे दिल्यानंतर मात्र संबंधितांनी पुढे भाड्याचे पैसे देण्यास टाळाटाळ केली. ट्रक बाहेरगावी माल घेऊन पाठवला आहे, तिकडून पैसे आले की तुमचे भाडे देऊन टाकू, असे सांगत वेळ मारून नेली. दरम्यान, वर्ष उलटल्यानंतर पासिंगसाठी ट्रक आणावाच लागेल, असा तगादा कोळपे यांनी लावल्यानंतर व भाड्याचे पैसे वारंवार मागितल्यानंतर तिघांनीही कोळपे यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या