शिक्रापुर मध्ये घरात घुसून पती पत्नीस मारहाण...

Image may contain: text that says 'CRIME'
तळेगाव ढमढेरे, ता. १८ मार्च २०२० (एन. बी. मुल्ला): शिक्रापूर येथील ओरा सिटी येथे राहणाऱ्या एका दाम्पत्याच्या घरामध्ये प्रवेश करून एक महिला व एका युवकाने पती पत्नीस मारहाण करून घरातील साहित्यांची व २ कारचे नुकसान केले असून  शिक्रापूर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला  आहे.
           

शिक्रापूर (ता. शिरूर) येथील ओरा सिटी येथे राहणारी महिला मनीषा ढोकले ही तिच्या पती सोबत घरात असताना अर्चना हिवाळे ही महिला घरात आली आणि मोठ्याने आरडाओरडा करू लागली.यावेळी मनीषा यांनी तिला शांतपणे बोलू असे म्हटले असताना देखील तिने मनीषा यांना मारहाण केली.मनीषा यांचे पती गणेश मध्ये आले असताना त्यांना देखील हाताने मारहाण करण्यास सुरवात केली.

Image may contain: text that says 'भाषण करायला शिका... लाखो लोकांसमोर निर्भयतेने बोला! Art of Speech मो.नं. 9860927799 9615927799 प्रभावी वक्तृत्वाचा पासवर्ड... फक्त इथेच!'

यावेळी अनीत दिघे हा घरात आला आणि त्याने गणेश ढोकले यांना गजाने मारहाण करत मनीषा यांना सुद्धा मारहाण करून घरातील वस्तूंची नासधूस केली.याप्रसंगी शेजारील लोक गोळा झाले.दोघांनी देखील ढोकले यांना तुमच्या मुलांना उचलून नेऊन मारून टाकू अशी धमकी दिली आणि जाताना ढोकले यांच्या फोर्च्युनर व स्विफ्ट कार वर दगड टाकून नुकसान केले.याबाबत मनीषा गणेश ढोकले (रा. ओरा सिटी, शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अमित गोरक्ष दिघे (रा. मलठण फाटा, शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पुणे व अर्चना प्रकाश हिवाळे रा. सावळी विहीर, ता. राहता, जि. अहमदनगर) या दोघांवर गुन्हे दाखल केले असून पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जयप्रकाश चव्हाण हे पुढील तपास करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या