निवासी वस्तीगृहातील सर्व विद्यार्थ्यांना घरी पाठविले...

Image may contain: 2 people, people standing
तळेगाव ढमढेरे, ता. १८ मार्च २०२० (एन.बी. मुल्ला): तळेगाव ढमढेरे येथील निवासी वस्तीगृहातील २३० विद्यार्थ्यांना एकाच दिवशी कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या दृष्टिकोनातून सामाजिक न्याय विभागाच्या आदेशानुसार पालकांच्या ताब्यात देण्यात आले.त्यामुळे आज वस्तीगृहात शुकशुकाट दिसून आला.
           तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील समता विद्यार्थी वस्तीगृहातील ३६, महीलाश्रम वस्तीगृहातील ४८, आनंदाश्रम वस्तीगृहातील १४६ विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी काढलेल्या आदेशानुसार कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आजच तात्काळ पालकांना बोलावून इयत्ता पहिली ते नववी मधील २१३ विद्यार्थ्यांना वस्तीगृहातील हालचाल नोंदवहीत नोंद करून पालकांसमवेत (दि. ३१) मार्च पर्यंत घरी पाठविण्यात आल्याची माहिती समता विद्यार्थी वसतीगृहाचे अधीक्षक शंकर मुनोळी व आनंदाश्रम वस्तीगृहाच्या अधीक्षिका विजया अहिरे यांनी दिली.

Image may contain: text that says 'भाषण करायला शिका... लाखो लोकांसमोर निर्भयतेने बोला! Art of Speech मो.नं. 9860927799 9615927799 प्रभावी वक्तृत्वाचा पासवर्ड... फक्त इथेच!'

इयत्ता दहावीच्या परीक्षा संपल्या नसल्याने समता विद्यार्थी वस्तीगृहातील ३ विद्यार्थी व महिला आश्रमातील वस्तीगृहातील एक विद्यार्थिनी (दि. २३) मार्च रोजी इयत्ता दहावीच्या परीक्षा संपल्यानंतर पालकांच्या स्वाधीन करण्यात येणार असल्याचे महिला वस्तीगृहाच्या अधीक्षिका शशिकला खेडेकर यांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या