कोरोनामुळे पोलीस पाटलांनी गावामध्ये नियंत्रण ठेवावे...

Image may contain: 4 people, people sitting and indoor
तळेगाव ढमढेरे, ता. १८ मार्च २०२० (एन. बी. मुल्ला): सध्या देशभरात कोरोना सारख्या गंभीर आजाराचा प्रादुर्भाव होत असताना ग्रामीण भागामध्ये खबरदारी म्हणून वेगवेगळ्या उपाययोजना करणे गरजेचे असून त्यासाठी प्रत्येक गावातील पोलीस पाटलांनी गावामध्ये नियंत्रण ठेवणे गरजेचे असल्याचे मत सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर वैरागकर यांनी व्यक्त केले.
        



शिक्रापूर (ता. शिरूर) पोलीस स्टेशन येथे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना संदर्भात सर्व गावांतील पोलीस पाटील यांची बैठक आयोजित करण्यात आलेली होती.या बैठकीत सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर वैरागकर हे बोलत होते.प्रसंगी पोलीस पाटील जयसिंग भंडारे, पांडुरंग दरेकर, दत्तात्रय माने, राजेंद्र गायकवाड, प्रकाश करपे, वंदना साबळे, लक्ष्मण खैरे, आत्माराम डफळ, सचिन गव्हाणे आदी पोलीस पाटील उपस्थित होते.

Image may contain: text that says 'भाषण करायला शिका... लाखो लोकांसमोर निर्भयतेने बोला! Art of Speech मो.नं. 9860927799 9615927799 प्रभावी वक्तृत्वाचा पासवर्ड... फक्त इथेच!'

यावेळी बोलताना गावामध्ये कोणतेही कार्यक्रम घेऊ नये तसेच गावातील होणाऱ्या गर्दीवर आटकाव आणावा, बाहेर गावाहून कोणी गावामध्ये आल्यास त्यांना काही लक्षणे जाणवल्यास तत्काळ तपासणी करून घ्यावी.गावामध्ये रात्रगस्त वाढवून ग्राम सुरक्षा दल कार्यरत करण्याचे आवाहनही  यावेळी मयूर वैरागकर यांनी केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या