नवविवाहितेची आत्महत्या की हत्या नातेवाईकांचा आरोप...

Image may contain: one or more people, people standing and outdoor
सातारा, ता. १९ मार्च २०२० (प्रतिनिधी): सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील गिरवी येथील पुजा सतिश कदम यांनी आत्महत्या केली असल्याचा गुन्हा फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आला आहे.पण पुजा कदम यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी पुजा हिने आत्महत्या केली नसून तिचा खून केला असल्याचा आरोप केला आहे.तर संबंधित आरोपींवर खुणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.अखेर ३०२ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अहमदनगर जिल्ह्यातील केडगाव येथील पुजा दत्तात्रय निंबाळकर यांचा विवाह १ फेब्रुवारी २०२० रोजी यांचा विवाह सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील गिरवी येथील सतिश अरविंद कदम यांच्या बरोबर फलटण येथील जिजाई मंगल कार्यालय येथे करण्यात आला होता.पुजा हिचा संसार मात्र केवळ ४२ दिवसात उद्ध्वस्त झाला आहे.

Image may contain: text that says 'मो.नं. भाषण करायला शिका... लाखो लोकांसमोर निर्भयतेने बोला! Art of Speech 9860927799 9615927799 प्रभावी वक्तृत्वाचा पासवर्ड... फक्त इथेच!'

पदवीधर असणारी पुजा हिने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे.असा गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी पुजाचे नातेवाईक यांनी पुजा हिने आत्महत्या केली नसून तिचा खून झाला असल्याचा आरोप केला आहे.पोलिसांनी आरोपीला दोन दिवस पीसी देऊन 302 चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गिरवी गावातील ग्रामस्थांनी सावडण्याच्या दिवशी या घटनेचा निषेध केला आहे.संबंधित आरोपी वरती कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.तर नवविवाहितेचे नातेवाईकांनी सदरच्या घटनेबाबत खुणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या