दहावीच्या परीक्षेस बसलेल्या तोतया परीक्षार्थीवर गुन्हा दाखल

No photo description available.
तळेगाव ढमढेरे, ता. १९ मार्च २०२० (एन.बी. मुल्ला): निमगाव म्हाळुंगी येथील दहावीच्या परीक्षा केंद्रावर हॉल तिकीटवर खाडाखोड करत त्यावरील फोटो बदलून परीक्षा देण्यासाठी बसलेल्या तोतया परीक्षार्थी विद्यार्थ्यासह एका मुख्य विद्यार्थ्यावर शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची घटना घडली आहे.
            निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील विद्या विकास मंदिर येथे दहावीची परीक्षा सुरु असताना सदर परीक्षा केंद्राचे केंद्र संचालक दिलीप पवार हे परीक्षा केंद्रातील सर्व खोल्यांमध्ये परीक्षेला बसलेल्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांची तपासणी करत असताना त्यांनी परीक्षेसाठी बसलेल्या शेखर श्रीरंग पवार या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट तपासले असताना त्यांना त्याच्या हॉल तिकीटच्या रीसीटवर दुसऱ्याच मुलाचा फोटो असल्याचे निदर्शनास आले.त्यामुळे त्यांनी मूळ हॉल तिकीट आणि त्या परीक्षार्थी विद्यार्थ्याकडे असणारे हॉल तिकीट तपासले असता त्यांना दोन्ही फोटोमध्ये तफावत असल्याचे आढळून आले.

Image may contain: text that says 'भाषण करायला शिका... लाखो लोकांसमोर निर्भयतेने बोला! Art of Speech मो.नं. 9860927799 9615927799 प्रभावी वक्तृत्वाचा पासवर्ड... फक्त इथेच!'

तर पवार यांनी त्या मुलाचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव उमेश येलभर सांगितले.सदर विद्यार्थी हा तोतया असण्याची खात्री केंद्र संचालक दिलीप पवार यांची झाली.त्यानंतर पवार यांनी त्या परीक्षार्थी विद्यार्थ्याकडे चौकशी केली असता शेखर श्रीरंग पवार या मूळ परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे ऐवजी तो तोतया उमेश ज्ञानेश्वर येलभर हा विद्यार्थी परीक्षेला बसला असल्याचे सांगितले.त्यामुळे उमेश ज्ञानेश्वर येलभर हा तोतया असण्याची विद्यार्थी असल्याची खात्री केंद्र संचालक दिलीप पवार यांची झाली.याबाबत निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर)  येथील विद्याविकास मंदिर विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा परीक्षा केंद्राचे केंद्र संचालक दिलीप आनंदराव पवार (वय ५७ वर्षे, रा. सनराईज सोसायटी, वडगाव शेरी, ता. हवेली, जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी परीक्षेला बसलेला तोतया परीक्षार्थी उमेश ज्ञानेश्वर येलभर (वय २२ वर्षे, रा. मोटेवाडी, ता. शिरुर, जि. पुणे) तसेच हॉल तिकीट असणारा मूळ परीक्षार्थी शेखर श्रीरंग पवार या दोघांवर परीक्षा अधिनियम कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुरेश डुकले हे पुढील तपास करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या