अजित पवारांच्या जवळच्या नेत्याविरुद्ध गुन्हा दाखल...

Image may contain: 1 person, beard and closeup
पिंपरी चिंचवड, ता. १९ मार्च २०२० (प्रतिनिधी): पिंपरी चिंचवड महापालिकेतील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय असलेल्या नगरसेवक जावेद शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कारण महापालिकेतील कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या २५ वर्षीय महिलेस अश्लील शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा आरोप नगरसेवक जावेद शेख यांच्यावर महिलेने केला आहे.शेख यांच्याविरुद्ध अभियंता असलेल्या महिलेने पोलिसांकडे गुन्हा दाखल केला आहे.ही घटना सोमवारी आकुर्डी येथे घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख यांनी या महिलेस आकुर्डी येथील आपल्या कार्यालयात बोलावून घेतले आणि साईटवर आल्याशिवाय एकही वीट हल्ली तर मी बघून घेईन अशी धमकी देत त्यांच्या भागातील विकास कामाचा पाठपुरावा मी करायचा आणि दुसरे नगरसेवक क्रेडिट कसे घेऊन जातात अशी तंबी देखील शेख यांनी त्या महिला अभियंत्याला दिली.

Image may contain: text that says 'भाषण करायला शिका... लाखो लोकांसमोर निर्भयतेने बोला! Art of Speech मो.नं. 9860927799 9615927799 प्रभावी वक्तृत्वाचा पासवर्ड... फक्त इथेच!'

मी आजवर ४० - ५० गुन्हे केले आहेत.तू माझं काहीही बिघडवू शकत नाहीस, अशी धमकी देत इंजिनिअर महिला कर्मचाऱ्यास जावेद शेख यांनी अश्लील भाषा वापरून तंबी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.यानंतर महिलेच्या तक्रारीनुसार विनयभंग आणि धमकीचा गुन्हा निगडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी निगडी पोलीस तपास करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या