आपणच आमचे खरे हिरो आहात : सुप्रिया सुळे

Image may contain: one or more people and people sitting
पुणे, ता. १९ मार्च २०२० (प्रतिनिधी): देशात कोरोनाची लागण झालेले सर्वाधिक रुग्ण सध्या महाराष्ट्रात असून त्यांचा आकडा ४७ आहे.तर, आतापर्यंत कोरोना विषाणूमुळे एकाचा मृत्यू झाला आहे.कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण हे विदेशातून यात्रा करुन आलेले आहेत.मात्र, पहिल्या दिवसापासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रुग्णालयातील डॉक्टरांसह सर्व स्टाफ आणि आरोग्यमंत्री स्वतः झटत आहेत.जगभरात दहशत निर्माण केलेल्या कोरोना विषाणूने देशात कहर माजवला आहे.चीनमधून विविध देशात पसरलेल्या या जीवघेण्या विषाणूने भारतात ही एन्ट्री केली असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.देशवासियांची चिंता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.राज्यातील कोरोना ग्रस्तांची सद्य स्थिती आणि कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आरोग्यमंत्र्यांचे प्रयत्न पाहून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी भरभरून कौतुक केले आहे.आपण सर्वजण आमचे खरे हिरो आहात’ अशी प्रतिक्रिया सुळे यांनी ट्विटर वरून दिली आहे.

Image may contain: text that says 'भाषण करायला शिका... लाखो लोकांसमोर निर्भयतेने बोला! Art of Speech मो.नं. 9860927799 9615927799 प्रभावी वक्तृत्वाचा पासवर्ड... फक्त इथेच!'

”कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी झटणारे डॉक्टर्स, नर्स, रुग्णालयांचा इतर स्टाफ यांचे कौतुक.राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि आरोग्य मंत्रालयही परिस्थिती अतिशय उत्तमरित्या हाताळत आहेत.त्यांचा अभिमान वाटतो.याशिवाय पोलिस, सरकारी अधिकारी, एअरपोर्ट व सार्वजनिक स्थळी कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचेही मनापासून आभार.आपण सर्वजण आमचे खरे हिरो आहात.आपण एकत्रिपणे या संकटाचा सामना करु आणि ही लढाई नक्की जिंकू.असे खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या