पिकअप टेम्पो व बिस्किटांच्या बॉक्ससह चालक जेरबंद...

Image may contain: tree and outdoor
तळेगाव ढमढेरे, ता. १९ मार्च २०२० (एन. बी. मुल्ला): रांजणगाव गणपती येथील ब्रिटानिया कंपनी मधील बिस्किटाचे बॉक्स मुंबई येथे घेऊन जात असताना ट्रक वरील चालकाने अपहार करून ट्रकमधील बिस्किटाचे ६० बॉक्स काढून दुसऱ्या पिकअप टेम्पो मध्ये भरून दिले असताना सदर पिकअप टेम्पो शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने पकडला.त्यामुळे ट्रक चालकाचा बिस्कीट अपहाराचा डाव फसला असून शिक्रापूर पोलिसांनी पिकअप टेम्पो व बिस्किटांच्या बॉक्ससह पिकअप चालकाला जेरबंद केले आहे.
           शिक्रापूर (ता.शिरूर)  येथील पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक किरण भालेकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जयप्रकाश चव्हाण, अविनाश थोरात, राजेंद्र पवार, पोलीस नाईक तेजस रासकर, पोलीस शिपाई हरिभाऊ चव्हाण संतोष शिंदे हे पुणे नगर महामार्गावर रात्र गस्त करत असताना त्यांना कासारी फाटा येथे पिकअप (क्र. एमएच १५ बिजे ९८२९) हे  संशयितरित्या आढळून आले.यावेळी पोलिसांनी त्या पिकअपची पाहणी केली असता त्यामध्ये बिस्किटांचे बॉक्स आढळून आले.

Image may contain: text that says 'भाषण करायला शिका... लाखो लोकांसमोर निर्भयतेने बोला! Art of Speech मो.नं. 9860927799 9615927799 प्रभावी वक्तृत्वाचा पासवर्ड... फक्त इथेच!'

सदर चालकाकडे विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने पोलिसांचा संशय अजूनही बळावला.त्यामुळे पोलिसांनी पिकअपची तपासणी करत त्यातील बॉक्सच्या बिलांबाबत विचारणा केली असता चालकाकडे काहीही आढळून आले नाही.त्यामुळे पोलिसांनी ब्रिटानिया कंपनीशी संपर्क साधून शिक्रापूर येथे येण्याची विनंती केली.त्यांनतर सदर कंपनीचे व्यवस्थापक मतीन अली, प्रवीण वाघचौरे, अजय सिंग यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे येत पिकअप मधील बिस्किटांच्या बॉक्सची तपासणी केली असता त्यांना त्यांच्या कंपनीतील मुंबई येथे पाठविण्यासाठी ट्रक (क्र. एमएच १२ केपि १४४७) मधून चालक राम किसन राठोड याचेकडे देऊन मुंबई येथे पाठविले असल्याचे निदर्शनास आले.तर मुंबई येथे पाठविलेल्या ९९३ बॉक्स पैकी ६० बॉक्स ट्रक चालक राठोड याने अपहार करून काढून घेऊन संगनमत करून पिकअप चालकाला दिले असल्याचे कंपनीच्या व्यवस्थापकांच्या लक्षात आले.याबाबत रांजणगाव गणपती येथील ब्रिटानिया कंपनीचे फायनान्स व्यवस्थापक अलड्रीन एलिअस पशाना (वय ४९ वर्षे, रा.बकोरी फाटा, वाघोली, ता. हवेली, जि. पुणे)  यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.शिक्रापूर पोलिसांनी राम किसन राठोड व ऋषिकेश जनार्दन भोसले (रा. शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पुणे) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण भालेकर व तेजस रासकर हे पुढील तपास करत आहेत.


शिक्रापूर पोलिसांनी रात्रगस्त करत असताना संशयितपने मिळून आलेल्या पिकअप टेम्पोची चौकशी करून संशय आल्याने ब्रिटानिया कंपनीशी संपर्क साधून माहिती दिली.त्यांनतर अपहार होणारा माल जागेवर मिळून आला त्यामुळे कंपनी प्रशासनाकडून पोलिसांचे आभार मानण्यात आले.

No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या