धानोरे येथे जमुना दुध उत्पादक डेअरीमधुन संगणकाची चोरी...

Image may contain: text
तळेगाव ढमढेरे, ता. २० मार्च २०२० (एन. बी. मुल्ला): धानोरे येथील जमुना दुध उत्पादक डेअरीमधील संगणक, इंव्हटर व बॅटरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली असल्याची घटना घडली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला  आहे.
         



धानोरे (ता. शिरूर) येथील जमुना दुध उत्पादक डेअरीचे सुपरवायझर संभाजी ढमढेरे हे सायंकाळच्या सुमारास डेअरी बंद करून घरी गेले होते.घरी जात असताना डेअरीमधील संगणक, इंव्हटर व बॅटरी टेबलवर होती.दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास ढमढेरे यांनी डेअरी उघडली असता त्यांना डेअरी मधील वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या दिसून आल्या.

Image may contain: text that says 'भाषण करायला शिका... लाखो लोकांसमोर निर्भयतेने बोला! Art of Speech मो.नं. 9860927799 9615927799 प्रभावी वक्तृत्वाचा पासवर्ड... फक्त इथेच!'

डेअरीमध्ये त्यांनी पाहणी केली असता टेबलवरील संगणक, इंव्हटर व बॅटरी दिसली नाही.तसेच डेअरीच्या मागील बाजूची जाळी वाकलेली दिसून आली.त्यामुळे कोणीतरी डेअरीतील संगणक, इंव्हटर व बॅटरी चोरून नेले असल्याची खात्री ढमढेरे यांना झाली.



याबाबत संभाजी परशुराम ढमढेरे (रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश डुकले हे पुढील तपास करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या