कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शिक्रापूर ३ दिवस बंद

Image may contain: 10 people, people sitting
तळेगाव ढमढेरे, ता. २० मार्च २०२० (एन.बी. मुल्ला): कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय आणि जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन करण्याचा निर्णय घेऊन शिक्रापूर गाव पूर्णपणे बंद ठेवत सर्व व्यवसाय व दुकाने बंद करण्याचा निर्णय शिक्रापूर येथील तब्बल ८०० व्यापाऱ्यांनी स्वयंस्फुर्तीने घेतला आहे.गावातील यात्रा उत्सव देखील रद्द करण्यात आले असून गावातील मुस्लीम बांधवानी शुक्रवारची सामूहिक नमाज देखील रद्द केली आहे.
          शिक्रापूर (ता. शिरूर) येथे गुरुवार (दि. १९) मार्च रोजी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजने संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शिक्रापूर गाव शुक्रवार (दि. २०) मार्च ते रविवार (दि. २२) मार्च असे ३ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.यावेळी प्रभारी सरपंच भगवान वाबळे,माजी सरपंच रामभाऊ सासवडे,व्यापारी असोसीएशनचे अध्यक्ष अशोक शहाणे,ग्रामविकास अधिकारी बी. बी. गोरे शेरखान शेख,लद्धाराम पटेल, सीराज शेख, संजय भांबुर्डेकर, किरण पुंडे, पप्पू पाबळे, प्रशांत सासवडे, दिलीप कोठावळे, निवृत्ती काळोखे, मंगेश विरोळे, भगवान पडवळ, सुरेश भुजबळ, रमेश गडदे, विजय लोखंडे, नाना चातुर, राजेंद्र मांढरे, भरत गवारे, गणेश काशीद, लाला गदादे आदी व्यापारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Image may contain: text that says 'भाषण करायला शिका... लाखो लोकांसमोर निर्भयतेने बोला! Art of Speech मो.नं. 9860927799 9615927799 प्रभावी वक्तृत्वाचा पासवर्ड... फक्त इथेच!'

यावेळी झालेल्या बैठकीत गावातील सर्व व्यवहार ३ दिवस पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून यामध्ये अत्यावश्यक सेवा असलेल्या हॉस्पिटल व मेडिकल स्टोअर यांना पूर्णपणे वगळण्यात आले आहे.तर किराणा दुकान, दुध डेअरी व भाजीपाला दुकाने फक्त सकाळी ३ तास उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.गावामध्ये औषध फवारणी करण्याचा तसेच गावातील रविवारचा बाजार तसेच दररोज भरला जाणारा भाजीपाला बाजार पूर्णपणे बंद ठेवण्याचा  निर्णय घेण्यात आला आहे.गावातील सर्व मंदिरे, यात्रा तसेच ज्ञानेश्वरी पारायण सोहळे देखील बंद ठेवण्यात आले आहेत.गावामध्ये दुकाने चालू ठेवणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्याचा देखील निर्णय घेण्यात आला आहे.मेडिकल स्टोअर मध्ये विकले जाणारे मार्स, सेनिटायझर जादा किमतीत विक्री न करण्याच्या सूचना देखील मेडिकल व्यावसायिकांना देण्यात येणार असून गावातील सर्व नागरिक, ग्रामस्थ तसेच व्यापाऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.गावातील सर्व मंदिरे, सप्ताह बंद ठेवण्याचा निर्णय झाला असतानाच गाव ३ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.


परंतु शुक्रवारी मुस्लीम समाजाची सामुहिक नमाज येत असल्यामुळे येथे मस्जिद मध्ये पाचशेहून अधिक मुस्लीम बांधव नमाज पठन साठी येत असतात.त्यामुळे हि गर्दी रोखण्यासाठी समाजहिताचा निर्णय म्हणून शुक्रवारी होत असलेला नमाज बंद केला असून प्रत्येकजण घरी नमाज पठन करेल असे यावेळी शिक्रापूर जामा मस्जिदचे प्रमुख सीराजभाई शेख यांनी सांगितले.शिक्रापूर येथील हनुमान देवाची यात्रा जवळ आलेली असताना कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता गावातील यात्रा रद्द करण्याचा निर्णय यात्रा कमिटीचे प्रमुख गोरक्ष सासवडे यांनी घेतला असून कोणताही कार्यक्रम न होता फक्त देवाची विधिवत पूजा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या