पिंपरी मध्ये दुकाने सुरू ठेवणाऱ्या १६ जणांवर गुन्हे दाखल

No photo description available.

पिंपरी, ता. २० मार्च २०२० (प्रतिनिधी): अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.या आदेशाबाबत जनजागृती नंतरही दुकाने सुरू ठेवणाऱ्या १६ जणांवर चिखली पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.पिंपरी चिंचवड शहरासह जगभरात कोरोना या साथीच्या आजाराने थैमान घातले आहे.या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना बंद करण्याचे आदेश दिले आहेत.याबाबत शहरातील पोलिसांनी ध्वनीक्षेपकावरून चिखली परिसरातील सर्व नागरिकांना बुधवारी (दि. १८) आवाहन केले होते.

Image may contain: text that says 'भाषण करायला शिका... लाखो लोकांसमोर निर्भयतेने बोला! Art of Speech मो.नं. 9860927799 9615927799 प्रभावी वक्तृत्वाचा पासवर्ड... फक्त इथेच!'

मात्र त्यानंतरही गुरुवारी अनेक दुकानदारांनी पोलिसांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करीत दुकाने सुरूच ठेवली.यामुळे चिखली पोलिसांनी १६ दुकानदारांवर भारतीय दंड विधान कलम १८८ नुसार गुन्हे दाखल केले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी दिली.पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या