सासवडमध्ये ३ दुकानदारांवर गुन्हे दाखल...

Image may contain: text
सासवड, ता. २० मार्च २०२० (प्रतिनिधी): कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला विळखा घातल्याने मोठे संकट उभे राहीले आहे.या विषाणू पासून बचावासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यानी आपत्कालीन व्यवस्थापन कायदा लागू केला आहे.याची सर्व स्तरावर प्रभावीपणे अमल बजावणी केली जात आहे.पुरंदर च्या तहसिलदार रूपाली सरनोबत यांनी वारंवार आवाहन करूनही याआदेशाचा अवमान करणाऱ्या सासवड मधील ३ दुकानदारांना पोलीसांनी चांगलाच दणका दिला आहे.

Image may contain: text that says 'भाषण करायला शिका... लाखो लोकांसमोर निर्भयतेने बोला! Art of Speech मो.नं. 9860927799 9615927799 प्रभावी वक्तृत्वाचा पासवर्ड... फक्त इथेच!'

बधाई स्वीट होमचे तुळशीराम बेलाजीरामजी चौधरी, मावा टपरी चालक बाळासाहेब लक्ष्मण म्हेत्रे आणि संजीवनी आईस्क्रीम पार्लर चे अर्जुन भवानी जाट या तीघावर भा. द. वि. क १८८ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राहूल घुगे.पोलीस हवालदार के. एन. माने,एस. एम. चांदगुडे, महेश खरात, कृष्णा कानतो डे. गोपनीय विभागाचे भगीरथ घुले,पोलीस नाईक अजित माने, राहूल कोल्हे यानी ही कारवाई केली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या