पुण्यात चंदन चोरट्याकडून गावठी कट्टा हस्तगत...

Image may contain: 7 people, people standing
पुणे, ता. २० मार्च २०२० (प्रतिनिधी): कोंढव्यातील एका चंदन चोरट्याकडून पोलिसांनी गावठी कट्टा व २ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.विष्णु देविदास कसबे (वय २३, रा. शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द) असे त्याचे नाव आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस नाईक कौस्तुभ जाधव यांना बातमी मिळाली की, कोंढव्यातील शिवनेरीनगर येथे १ जण संशयितरित्या फिरत असून त्यांच्याकडे पिस्तूल आहे.ही बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सांगून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तेथे जाऊन मिळालेल्या बातमीनुसार विष्णु कसबे याला ताब्यात घेतले.त्याच्याकडे १० हजार रुपये किंमतीचा गावठी बनावटीचा कट्टा व २ जिवंत काडतुसे सापडली.

Image may contain: text that says 'भाषण करायला शिका... लाखो लोकांसमोर निर्भयतेने बोला! Art of Speech मो.नं. 9860927799 9615927799 प्रभावी वक्तृत्वाचा पासवर्ड... फक्त इथेच!'

याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी सांगितले की, विष्णु कसबे याच्याकडून गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे.त्याच्याविरुद्ध २०१८ मध्ये एक चंदन चोरीचा गुन्हा दाखल आहे.त्याने हा गावठी कट्टा कशासाठी जवळ बळागला होता.त्याच्या सहाय्याने त्याने आणखी कोणता गुन्हा केला का याचा तपास पोलीस करीत आहे.ही कामगिरी परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त सुहास बवाचे,सहायक पोलिस आयुक्त सुनील कलगुटकर ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, पोलीस निरीक्षक गुन्हे , महादेव कुंभार, यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंदे, सहायक फौजदार इकबाल शेख, कौस्तुभ जाधव, उमाकांत स्वामी,सुरेश भापकर,गणेश आगम, जगताप,चव्हाण,विशाल गवळी,सुशील धिवार,सचिन उर्फ पप्पू, पृथ्वीराज पांडुळे, अझीम शेख यांनी केली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या