कोरोनाचा विषाणू रोखण्यासाठी केवळ लॉकडाऊन पुरेसे नाही

Image may contain: outdoor
पुणे, ता. २३ मार्च २०२० (प्रतिनिधी): जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे.चीननंतर इटलीमध्ये कोरोनानाने मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.तसेच युरोपात कोरोनाने बऱ्यापैकी हातपाय पसरवले आहेत.तर भारतातही हळूहळू कोरोनांच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे.त्यामुळे कोरोना वायरस देशात आणि जगात सक्रीय होत असल्याचं दिसत आहे.कोरोनाची अशी भयंकर परिस्थिती असल्याने अनेक देशांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे.गर्दीच्या शहरांमध्ये कर्फ्यू लागू करून नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन केले आहे.यावर WHOच्या (जागतिक आरोग्य संघटना) माईक रायन यांनी वाढत्या कोरोनाच्या संसर्गावर काबू मिळवण्यासाठी केवळ लॉक डाऊन पुरेस नसल्याचं म्हंटल आहे.त्यासाठी याक्षणी आजारी असणाऱ्या लोकांना शोधण्याची व त्यांच्यावर देखरेख ठेवण्याची गरज आहे.असे केल्यास कोरोनाला रोखता येईल.

Image may contain: text that says 'भाषण करायला शिका... लाखो लोकांसमोर निर्भयतेने बोला! Art of Speech मो.नं. 9860927799 9615927799 प्रभावी वक्तृत्वाचा पासवर्ड... फक्त इथेच!'

माईक रायन यांच्या मते, लॉकडाऊनची सर्वात मोठी समस्या अशी आहे की जेव्हा ते संपेल तेव्हा लोक अचानक मोठ्या संख्येने बाहेर येतील आणि परिस्थिती पुन्हा धोक्याची होईल.आता प्रत्येक देशानी खबरदारी म्हणून अनेक शहरांमध्ये संचारबंदी आणि कडक बंद पुकारला आहे. त्यामुळे नागरिक घरात बसून वाढत्या संसर्गाला अटकाव घालण्याचा प्रयत्न करत आहेत.मात्र, कितीदिवस असे घरात नागरिकांना डांबून ठेवण्यात येईल केव्हातरी नागरिक रस्त्यावर उतरतील आणि त्यावेळी मोठी गर्दी होईल.या वाढलेल्या गर्दीमुळे पुन्हा एकदा कोरोन बळावण्याची शक्यता आहे, असा धोका माईक रायन यांनी आपल्या निवेदनातून व्यक्त केला आहे.माईक रायन यांच्या मते, चीन, सिंगापूर आणि दक्षिण कोरिया लॉकडाऊनवर गेले तेव्हा कोरोना विषाणूचा धोका असलेल्या प्रत्येक व्यक्तीची त्यांनी चौकशी केली.आता युरोप, अमेरिका, भारत आणि इतर देशांनी समान मॉडेल लागू केले पाहिजे.जर त्याचा प्रसार होण्यापासून रोखला गेला तर रोगाचा सामना केला जाऊ शकतो.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या