...आता पेट्रोल, डिझेल मिळणार नाही

No photo description available.
पुणे, ता 24  मार्च २०२०:  राज्यातील कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाने आता पेट्रोल पंप चालकांना सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल, डिझेल विक्री करण्यास प्रतिबंध केला आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज (मंगळवार) सायंकाळी जारी केले.

पुणे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्याचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपावर आता अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच डिझेल आणि पेट्रोल उपलब्ध होणार आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता अन्य वाहनांना पेट्रोल, डिझेलची विक्री करू नये, असे आदेश जिल्हाधिकारी राम यांनी दिले आहेत.


अत्यावश्यक सेवेतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह कोरोना नियंत्रणाबाबत कार्यरत व्यक्तींची यादी संबंधित विभागाकडून संकलित आणि शहानिशा करून ती पेट्रोल पंपधारकांना देण्यात येणार आहे. ही यादी उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राम यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी आणि अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

केवळ यांना उपलब्ध होणार पेट्रोल-डिझेल:
- अत्यावश्यक सेवेतील सर्व अधिकारी, कर्मचारी
- कोरोना नियंत्रण आणि निर्मूलनासाठी कार्यरत खासगी व्यक्ती
- अत्यावश्यक वस्तू व सेवा संदर्भात कार्यरत असणाऱ्या खासगी व्यक्ती
- वैद्यकीय उपचार आणि सहाय्यतेची गरज असणाऱ्या व्यक्ती

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या