शिरूर तालुक्यात आढळला कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण...

Image may contain: plant
शिरूर, ता. २४ मार्च २०२०: देशभरात कोरोना या संसर्गजन्य रोगाने थैमान घातलेले असताना आणि त्यामुळे संपूर्ण राज्य हादरून गेले आहे, तर संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आलेली असताना आज (मंगळवार) शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथील एका रुग्णाला कोरोनाची लागण होऊन त्याचे अहवाल पॉझीटीव्ह आलेले असल्यामुळे शिरूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

सणसवाडी (ता. शिरूर)  येथील एका व्यक्तीचा गेल्या आठवड्यात अपघात झाला होता. त्यावेळी सदर व्यक्तीला शिक्रापूर येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्याच्या पायाचे हाड तुटून गंभीर दुखापत झाली असल्याचे समोर आल्याने त्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी शिक्रापूर येथीलच दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यावेळी सदर व्यक्तीला दोन दिवस शिक्रापूर येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी ठेवण्यात आले होते. त्यांनतर त्याला पुणे येथे हलविण्यात आले होते.पुणे येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना सदर व्यक्तीला कोरोनाची लक्षणे दिसून आली. त्यामुळे सदर व्यक्तीच्या काही तपासण्या करण्यात आल्या. त्या तपासण्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर सदर व्यक्तीच्या तपासण्यांचे अहवाल कोरोना पॉझेटीव्ह आले आणि एकच खळबळ उडाली. त्यांनतर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे, तालुका आरोग्य पर्यवेक्षक सुरेश लवांडे, शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैजिनाथ कशिद, तळेगाव ढमढेरे ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य पर्यवेक्षक जालिंदर मारणे, आरोग्य सेवक एस. एस. चोपडा आदींनी सणसवाडी येथे सदर रुग्ण राहत असलेल्या ठिकाणी धाव घेत पाहणी करून सदर रुग्णाला भेटणाऱ्या त्याच्या घरातील सर्व नातेवाइकांची तपासणी केली.  त्यांनतर त्याच्या कुटुंबातील पाच जणांना पुणे येथील नायडू हॉस्पिटल येथे तपासणीसाठी नेण्यात आले आहे. सणसवाडी परिसरात कोरोनाचा रुग्ण आढळून आला असल्यामुळे शिरूर तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.   


प्रशासनकडून सणसवाडी येथे रुग्ण आढळून आलेल्या ठिकाणापासून काही परिसर पूर्णपणे बंद करण्यात आला असून, त्या ठिकाणी औषध फवारणी करण्यात आलेली आहे. तर पुढील काही काळ देखील येथे आरोग्य अधिकाऱ्यांच्या वतीने वेगवेगळ्या तपासण्या करण्यात येणार असून, पोलिसांना कडून देखील विशेष काळजी घेत या परिसरामध्ये नागरिकांना फिरू देण्यास बंदी घालण्यात आली आहे.


शिक्रापूरचे ते दोन हॉस्पिटल बंद .....
सणसवाडी येथे आढळून आलेला रुग्ण अपघात झाल्यानंतर शिक्रापूर येथील दोन हॉस्पिटलमध्ये काही काळ उपचार घेत होता. त्यांनतर पुणे येथील तपासणी अहवालात कोरोना पॉझीटीव्ह अहवाल आले आणि त्यामुळे त्या रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या अनेकांना त्याचा धोका असल्यामुळे प्रथम शिक्रापूर येथे उपचार घेत असलेले दोन हॉस्पिटल बंद करण्यात आले आहेत. मात्र, या दोन्ही हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी आम्ही काळजी आणि खबरदारी म्हणून हॉस्पिटल बंद ठेवले असल्याचे सांगितले.

सणसवाडी येथील इतरांची तपासणी...

सणसवाडी येथे एक रुग्ण कोरोना पॉझेटीव्ह रुग्ण आढळून आला असून, त्याच्या घरातील इतरांना तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहे. तसेच सदर रुग्णाच्या संपर्कात आलेल्या इतर लोकांची तपासणी करून त्यांच्यावर आरोग्य अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ठेवणार असल्याचे शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे यांनी सांगितले.

No photo description available.

कोरोना व्हायरस विषयी काय काळजी घ्यावी याविषयी माहिती देताना श्री गजानन हॉस्पिटलचे डॉ अंकुश लवांडे....

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या