एकाच कुटुंबातील ९ जण कोरोनाची बाधा...

Image may contain: plant
मुंबई,ता. २५ मार्च २०२० (प्रतिनिधी): कोरोनाचा प्रचार दिवसेंदिवस वाढतच असुन महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या ११२ वर पोहोचली आहे.सांगली जिल्ह्यात एकाच कुटुंबातील ९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.या कुटुंबातील ४ जणांना आधीच कोरोना झाला होता.त्यानंतर कुटुंबातील आणखी ५ सदस्यांचे अहवालही पॉझिटिव्ह आले आहेत.त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत आणखीनचं भर पडली आहे.


कोरोनाबाधित कुटुंब हे इस्लामपूरमधील रहिवासी असल्याची माहिती मिळाली असुन मिरजेच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये या कोरोना बाधितांवर उपचार सुरु आहेत. नव्याने वाढ झालेल्या कोरोना बाधितांमध्ये २ महिला, २ पुरुष आणि १ लहान मुलीचा समावेश आहे.एकाच कुटुंबातील ९ जणांना कोरोनाची लागण झाल्यामुळे या संकटाच्या भीषणतेची तीव्रता लक्षात येत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या